अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेने कामगारांचे वेतन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:56+5:302021-07-23T04:21:56+5:30

तुमसर : घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत तुमसर शहरातील दैनंदिन उत्पन्न होणाऱ्या कचऱ्याचे संकलन वाहतूक व प्रक्रिया करण्याचे कंत्राट निविदेतून २४ टक्के ...

Wages of workers due to negligence of officers | अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेने कामगारांचे वेतन थकीत

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेने कामगारांचे वेतन थकीत

Next

तुमसर : घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत तुमसर शहरातील दैनंदिन उत्पन्न होणाऱ्या कचऱ्याचे संकलन वाहतूक व प्रक्रिया करण्याचे कंत्राट निविदेतून २४ टक्के बिलोने शारदा महिला मंडळ हिवरा बाजार रामटेक यांना दिले आहे. त्या कंत्राटदाराने २०१९ ते २०२१ पर्यंत कामे केली. त्यामुळे कंत्राटदाराचे थकीत देयके देण्यात यावे, शहरातील घनकचरा व्यवस्थापन तात्काळ मार्गी लागावा, यासाठी प्रशासकीय स्तरावर कसोशीने प्रयत्न केला. विकास कामात कुठे ही कमी पडलो नाही. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेने कामगारांचे वेतन थकीत राहिले आहे, अशी माहीती पत्र परिषदेत नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी दिली.

आजही कंत्राटदाराचे वेतन देयके थकीत आहेत. त्यामुळे या घनकचरा व्यवस्थापनाच्या उदभवलेल्या परिस्थितीस जिल्हा सहआयुक्त, नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता आरोग्य विभागतुमसर हेच जवाबदार असल्याच्या आरोप नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले. मात्र काही असामाजिक तत्त्वांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना वेठीस धरून प्रतिमा मलिन करण्याचे कार्य करीत सुटले आहेत. शहर विकासासाठी कटिबद्ध असल्याचा प्रमाण देत कंत्राटदाराचे देयके तात्काळ न मिळाल्यास सर्व पक्षीय नगरसेवकासह प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येईल, इशाराही पडोळे यांनी दिला. यावेळी नगर परिषद उपाध्यक्षा गिता कोंडेवार, विरोधी पक्षनेता अमरनाथ रगडे, बांधकाम सभापती सचिन बोपचे, पाणीपुरवठा सभापती मेहताबसिंह ठाकुर, नगरसेवक सलाम तुरक, राजेश बाळा ठाकूर, राजू गायधने, किरण जोशी, अर्चना भुरे, प्रमोद घरडे,

विक्रम लांजेवार, शिव बोरकर व ईतर सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: Wages of workers due to negligence of officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.