वैनगंगा प्रदूषणमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:09 PM2018-07-23T23:09:17+5:302018-07-23T23:09:38+5:30
नागपूर येथे पावसाळी अधिवेशन विधानसभा नागपूरला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना वैनगंगा बचाव अभियान अंतर्गत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, न्याय गर्जना संघटना, भंडारा जिल्हा स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वैनगंगा नदी प्रदूषणमुक्त होऊन नागपुरच्या नाग नदीचे सांडपाणी हे थांबविण्यात यावे, भंडारा वासीयांना रोगराईमुक्त जीवन जगण्याची शासनानी संधी द्यावी, त्यावर लवकरात लवकर योग्य नियोजन करावे व भविष्याकरिता आरोग्याकरिता जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी हा जनतेचा अधिकार त्यांना देण्यात यावा, अशी चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नागपूर येथे पावसाळी अधिवेशन विधानसभा नागपूरला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना वैनगंगा बचाव अभियान अंतर्गत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, न्याय गर्जना संघटना, भंडारा जिल्हा स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वैनगंगा नदी प्रदूषणमुक्त होऊन नागपुरच्या नाग नदीचे सांडपाणी हे थांबविण्यात यावे, भंडारा वासीयांना रोगराईमुक्त जीवन जगण्याची शासनानी संधी द्यावी, त्यावर लवकरात लवकर योग्य नियोजन करावे व भविष्याकरिता आरोग्याकरिता जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी हा जनतेचा अधिकार त्यांना देण्यात यावा, अशी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी वैनगंगा बचाव अभियान समिती प्रमुख राकाँ शहर अध्यक्ष नितीन तुमाने, न्याय गर्जना संघटना प्रमुख प्रशांत गभणे, प्रतिक फुलसुंगे, साहिल टिचकुले, पवन कुंभारे, हिमांशू मेंढे, लोकेश नगरे, संदीप निंबार्ते, टिचकुले, कुंभारे, अरविंद पडोळे, जॉन स्कॉट, अक्षय रामटेके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.