वैनगंगा नदी इशारा पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:40 PM2018-08-29T22:40:00+5:302018-08-29T22:40:21+5:30

शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा जलस्तर बुधवारी इशारा पातळीवर असून सकाळी या ठिकाणी ९.४० मीटर जलस्तर मोजण्यात आला. सीमावर्ती प्रदेशात झालेल्या पावसाने आणि विविध प्रकल्पातून पाणी सोडल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Wainganga river signal level | वैनगंगा नदी इशारा पातळीवर

वैनगंगा नदी इशारा पातळीवर

Next
ठळक मुद्दे९.४० मीटर जलस्तर : सीमावर्ती प्रदेशात झालेल्या पावसाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा जलस्तर बुधवारी इशारा पातळीवर असून सकाळी या ठिकाणी ९.४० मीटर जलस्तर मोजण्यात आला. सीमावर्ती प्रदेशात झालेल्या पावसाने आणि विविध प्रकल्पातून पाणी सोडल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
भंडारा शहराजवळ कारधा येथे बुधवारी सकाळी पाणी पातळी ९.४० मीटर होती. इशारा पातळी ९ मीटर असून धोका पातळी ९.५ मीटर आहे. सीमावर्ती भागात झालेल्या पावसामुळे वैनगंगेचे पाणी इशारा पातळीपर्यंत पोहचले आहे. वैनगंगेची पाणी पातळी वाढत असल्याने पवनी येथील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. केंद्रीय जल आयोगाच्या सूत्रानुसार वैनगंगा नदीचा जलस्तर रात्री ९.४० मीटरवर पोहचला होता. परिणामी गोसी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्याने पाणी पातळी ३२ से.मी. ने घटली आहे. बुधवारी दुपारी वैनगंगेचा जलस्तर कारधा जवळ ९.०८ मीटर मोजण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व वक्रदार उघडले
पवनी : भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून वैनगंगेची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे पवनी येथील गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. बुधवारी सकाळी प्रकल्पाचे सात दरवाजे दीड मीटरने तर २६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. या ३३ दरवाज्यातून २ लाख ७१ हजार ११३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पुजारीटोला प्रकल्पाचे आठ आणि कालीसराड प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडल्याने वैनगंगेची पातळी वाढली आहे.

Web Title: Wainganga river signal level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.