बससाठी प्रवाशांना दीड तास प्रतीक्षा

By admin | Published: June 2, 2017 12:23 AM2017-06-02T00:23:16+5:302017-06-02T00:23:16+5:30

प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद असलेल्या एस.टी. महामंडळाच्या तुमसर बसस्थानकावरून भंडारा जिल्हास्थळी जाण्यास ७.३० नंतर नऊ वाजता

Wait for the bus for one and a half hour for the bus | बससाठी प्रवाशांना दीड तास प्रतीक्षा

बससाठी प्रवाशांना दीड तास प्रतीक्षा

Next

सायंकाळी ७.३० नंतर ९ वाजता बस : तुमसरहून भंडाराला जाण्यासाठी गैरसोय
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद असलेल्या एस.टी. महामंडळाच्या तुमसर बसस्थानकावरून भंडारा जिल्हास्थळी जाण्यास ७.३० नंतर नऊ वाजता एक बस उपलब्ध आहे. तब्बल दीड तासांपर्यंत प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. नऊची बस दुसऱ्या आगाराची आहे. ती बस वेळेवर येत नसल्याने प्रतीक्षा करावी लागते. नागपूर विभागात नफा मिळवून देणारे क्रमांक दोनचे तुमसर आगार आहे. हे विशेष.
भंडारा जिल्ह्यात तुमसर बसस्थानक क्रमांक दोनचे आगार आहे. दरवर्षी उत्पन्न मिळवून देण्यात तुमसर आगाराचा किमान दुसरा क्रमांक येतो. येथे बसगाड्या नियमित वेळेवर सुटत नाही. अशी ओरड शेकडो प्रवाशांची आहे. जिल्हा मुख्यालयी भंडारा येथे सायंकाळच्या सुमारास एकापाठोपाठ बसगाड्या आहेत. रात्री ८ नंतर केवळ रात्री नऊची बसगाडी आहे. तिही दुसऱ्या आगाराची बस आहे. तिची येण्याची निर्धारित वेळ नऊची असली तरी ती वेळेवर येत नाही. अनेकदा तिची बरीच प्रतीक्षा प्रवाशांना करावी लागते. संध्याकाळी सहा नंतर ६.३० वाजता, संध्याकाळी ७.३० वाजता भंडारा येथेजाण्याकरिता बसगाड्या आहेत. रात्री ८ नंतर येथे बसगाडीची सुविधा नाही. ७.३० ची बस रात्री ८ वाजता सोडली तर प्रवाशांना रात्री नऊ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. परंतु त्याकडे तुमसर आगाराचे दुर्लक्ष दिसून येत आहे. केवळ अर्धा तास उशिरा बसगाडी सोडली तर नोकरीपेश लोकांना सुविधा उपलब्ध होईल. सायंकाळी एकापाठोपाठ बसगाड्या सोडण्यापेक्षा केवळ एक बस येथे उशिरा सोडण्याची गरज आहे. मागील अनेक दिवसांपासून येथे प्रवाशांची मागणी असूनही तुमसर आगार लक्ष देत नाहीत. शेवटी प्रवाशांच्या सेवेसाठीच बसगाड्या आहेत. त्यांना त्रास देण्यासाठी नाही. परंतु याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जात आहे. तुमसर आगाराचे व्यवस्थापन नक्कीच चांगले आहे. स्पर्धेच्या युगात तुमसर आगाराने दरवर्षी नागपूर विभागात उत्पन्नात दुसरा स्थान पटकाविण्यात यशस्वी होत आहे. परंतु प्रवाशांच्या तक्रारीकडे येथे लक्ष देण्याची तितकीच गरज आहे. तुमसर आगाराला एसटी महामंडळाने नवीन गाड्या देण्याची येथे गरज आहे. दुसऱ्या आगारातील अनेक गाड्या तुमसरात दाखल झाल्या आहेत. काही बसगाड्यांचे आयुष्य संपले आहे तरी त्या रस्त्यावर धावत आहेत. तुमसर आगाराला किमान १० नवीन बसगाड्या देण्याची गरज आहे.

संध्याकाळी भंडारा येथे एकापाठोपाठ जाणाऱ्या तीन बसगाड्या दुसऱ्या आगाराच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वेळेत बदल मला करता येत नाही. परंतु प्रवाशी उपबल्ध असल्यास तशी विनंती संबंधित बसस्थानकांना करता येईल. प्रवाशांच्या सेवेसाठीच एसटी महामंडळ आहे.
-नितीन उजवणे,
आगार प्रमुख, तुमसर.

Web Title: Wait for the bus for one and a half hour for the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.