१२.५० लाखांच्या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा
By admin | Published: January 31, 2016 12:36 AM2016-01-31T00:36:52+5:302016-01-31T00:36:52+5:30
पालोरा गावात सन २०१३ पासून भीषण पाणी टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरु आहे. वादविवाद वाढीस लागले आहेत.
युवराज गोमासे करडी
पालोरा गावात सन २०१३ पासून भीषण पाणी टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरु आहे. वादविवाद वाढीस लागले आहेत. ग्रामसभांमधून प्रश्न विचारले जात आहे. पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन बुजलेली असल्याने पाणी समस्या गावात आहे. सुमारे १२.५० लाखाचा प्रस्ताव जि.प. मधून मंजूर झालेला असून सिईओंच्या प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पालोरा गावातील पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन बुजलेली आहे. गावात पाण्याचे वितरण होण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सन २०१३ पासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तासन्तास भटकावे लागते. अनेकदा समस्या गावकऱ्यांनी ग्रामसभेत मांडली, गावात पाण्याच्या समस्येवरून वादविवाद वाढीस लागले. परंतु प्रत्येक वेळी योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी १२.५० लाखांचा अंदाजपत्रक ग्रामपंचायतीने तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व जिल्हा पाणी पुरवठा समितीची मंजूरी मिळाली आहे. मात्र प्रस्तावाला अजूनही मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजूरी प्रदान केलेली नाही. ही वास्तव्य स्थिती आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या पाहता सीईओंनी तात्काळ प्रकरण मार्गी लावण्याची मागणी आहे.