दोन वर्षांपासून लाभार्थी पिकविम्याच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:26 PM2017-12-16T23:26:46+5:302017-12-16T23:27:10+5:30
आॅनलाईन लोकमत
पालांदूर : सन२०१४-१५ व २०१५-१६ चे पिकविमा प्रकरण मंजूर होऊनही पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे शासनस्तरावर पात्र ठरूनही मागील दोन वर्षापासून नत्थू सीताराम खंडाईत या शेतकऱ्याची पायपीट सुरूच आहे. शेतकºयांचा कुणी वाली नाही का? असा प्रश्न ते लोकप्रतिनिधींना विचारत आहेत.
शेतकºयाच्या नावावर विकासाच्या गप्पा मारणे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकारणासाठी शेतकऱ्यांचा उपयोग केला जात असून त्याच्या विकासासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे वास्तव पालांदूर परिसरात दिसत आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत त्यांनी पिकविमा काढला होता.
मागील दोन वर्षात लाखनी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केला. आणेवारीच्या आकडेवारीवरून तत्कालीन प्रशासनाने पिकविमा मंजूर करीत सेवा सहकारी संस्थेमार्फत जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांना पिकविमा मंजूर करीत सेवा सहकारी संस्थेमार्फत जिल्हा बँकेतून हजारो शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ देण्यात आला. मात्र त्याच कालावधीत ग्रामीण बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ दिला नाही.
प्रगतशिल शेतकरी नत्थू खंडाईत यांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना लेखी तक्रार केली. उपनिबंधकांनी सदर प्रकरणाला न्याय देत अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया ला पत्र पाठवून मंजूर झालेली रक्कम शेतकºयांना देण्याचे सांगितले. परंतु आजपर्यंत खंडाईत यांना मदत मिळाली नाही.