‘फाईव्ह-जी’कडेच वाटचाल, मात्र गाडा अडकला ‘थ्री जी’तच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:29 AM2021-01-02T04:29:17+5:302021-01-02T04:29:17+5:30
बहुधा शहरी भागासह ग्रामीण भागात नेटचा खोडा निर्माण होतो. अशा समस्या असताना पुढे-पुढे जाताना थोडे मागे वळून पाहिलेले बरे! ...
बहुधा शहरी भागासह ग्रामीण भागात नेटचा खोडा निर्माण होतो. अशा समस्या असताना पुढे-पुढे जाताना थोडे मागे वळून पाहिलेले बरे! सध्या पाचव्या पिढीकडे मोबाईल जात असताना हल्लीच्या टू-जी , थ्री-जी , फोर-जी या सेवाच व्यवस्थित मिळत नाहीत. तरीही फाईव्ह-जीकडे वाटचाल सुरू झाली आहे. आधी पूर्वीच्या सेवा व्यवस्थित व सुरळीत करणे गरजेचे आहे. तेव्हाच पुढील पाऊल यशस्वी पडू शकेल. विविध कंपनींच्या मोबाईल नेटवर्क तथा नेटमध्ये सदैव अडचणी येतात. त्यामुळे ग्राहकही वैतागले आहेत. फोर-जी चे रिचार्ज मारून नेटचा स्पीड मिळत नाही, अशा प्रत्येक ग्राहकाच्या तक्रारी आहेत. थ्री-जी, फोर-जी ची चाके रुतलेली असताना केवळ नावापुरतेच पुढे जाणे का? सेवा मात्र पूर्वीची मिळेल. शिवाय रिचार्जचा खर्च वाढणार. मात्र, त्या प्रमाणात सेवा मिळत नाही. नेहमीच ग्राहकांना नेटवर्क, नेटच्या अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणजेच मोठा आर्थिक भुर्दंड सोसूनही ग्राहकांनी गप्प बसायचे का? असा सवाल अनेक ग्राहक करीत आहेत. तेव्हा विज्ञानातील प्रगती सर्वांना मान्य आहे. पुढे जायला हरकत नाही. मात्र, मागील परिस्थिती नीट करूनच पुढे जावे. फाईव्ह-जीकडे वाटचाल करताना मोबाईल कंपन्यांनी थोडे मागे वळून पाहायला हवे. आताच्या काळातील वेगवान व स्पर्धात्मक युगात मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना व्यवस्थित सेवा मिळावी, ही ग्राहकांची रास्त अपेक्षा आहे.