ज्युनिअर आयडल फेम सुंगधाच्या उपस्थितीत ‘वॉकथॉन’
By admin | Published: July 15, 2016 12:48 AM2016-07-15T00:48:11+5:302016-07-15T00:48:11+5:30
समाजात महिलांवर अन्याय, अत्याचार होण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
विद्यार्थिंनीची उपस्थिती : शहरातील मुख्य मार्गाने निघाली रॅली, महिलांवरील अन्यायाविरुद्ध घोषणा
भंडारा : समाजात महिलांवर अन्याय, अत्याचार होण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या समस्यांवर जागृती व्हावी, यासाठी प्रयास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुधवारला शहरात वॉकथॉन घेण्यात आली. यात ज्युनिअर आयडल फेम सुगंधा दाते हिची मुख्य उपस्थिती होती.
अत्याचार स्त्रीभ्रुणहत्या, महिलांवरील अन्याय, महिलांच्या आरोग्य विषयी समस्या, किशोरवयीन मुलींच्या समस्यांवर जागृती निर्माण व्हाव्ही या उद्देशाने प्रयास बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने भंडारा जिल्ह्यात शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीनी एकत्र येऊन वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते
समाजात वाढत असलेल्या स्त्री तसेच किशोरवयीन मुलींच्या समस्यांवर जागृती निर्माण करणे आता गरजेचे झाले असून विशेषत: ग्रामीण भागात या विषयी अजूनही पाहिजे तशी जनजागृती नाही. यामध्ये महिलांचे सक्षमीकरण, बालमजुरी, बेटी बचाव, आरोग्य व स्वच्छता या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी भंडारा शहरात शाळकरी मुली तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीनी तर्फे भव्य वॉकथॉनचे आयोजन प्रयास या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.
या वॉकथॉनमध्ये स्वयंप्रेरणेने इंडियन आयडल ज्युनिअर फेम सुगंधा दाते स्वत: बेटी बचाव या विषयाला घेऊन वॉकथॉनमध्ये सहभागी झाली होती. त्यांचा हस्ते या वॉकथॉन ची सुरुवात करण्यात आली. व त्या सुद्धा यामध्ये सहभागी झाल्या. तर भंडारा शहरातील विविध शाळा तसेच महाविद्यालयातील तब्बल हजारोंच्या संख्येत विद्यार्थीर्नंचा उस्फुर्द प्रतिसाद दिसून आला ़
सुंगधा दाते यांच्या उपस्थितीत प्रयास फाउंडेशन सेनेटरी नेफ्कीन वेडिंग मशिन या प्रकल्पाला चालणा देणार असून या मशिन सर्व शाळा व महाविद्यालयात सरकारच्या माध्यमातुन लावण्यात यावे व त्यातुन मिळणारे नेफ्कीन्स हे कमीत कमी दरात मुलींना मिळावे, हा मुख्य उद्देश होता़ मुलींना व महिलांना एकत्र आणुन त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा ध्यास यावेळी घेण्यात आला़
उल्लेखनीय असे आहे की इंडियन आयडल ज्यूनियर फेम सुंगधा दाते या उपक्रमात उपस्थित होवून बेटी बचाव कार्यक्रमात वॉकथॉनमध्ये सहभागी झाली. ७ व्या वर्गात असणारी ही सुंगधा दाते यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. व वॉकथान चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला़ (शहर प्रतिनिधि)