ऐन पावसाळ्यात तुकडोजी वाॅर्डवासीयांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:41 AM2021-09-24T04:41:12+5:302021-09-24T04:41:12+5:30
बॉक्स किमान टँकरने तरी पाणीपुरवठा करा भंडारा शहरातील तुकडोजी वाॅर्डात दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने वाॅर्डातील नागरिक पाण्यामुळे त्रस्त ...
बॉक्स
किमान टँकरने तरी पाणीपुरवठा करा
भंडारा शहरातील तुकडोजी वाॅर्डात दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने वाॅर्डातील नागरिक पाण्यामुळे त्रस्त झाले आहेत. या परिसरात अनेक शासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी राहतात. त्यामुळे कार्यालयात वेळेत पोहोचणे गरजेचे असते. मात्र पाणीपुरवठा बंद असल्याने अनेकांना समस्या येत आहेत. या परिसरात कुठेही विहीर उपलब्ध नाही. त्यामुळे नळाला पाणी न आल्याने पाणी भरायचे कुठून असा प्रश्न आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत किमान वाॅर्डात टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी वॉर्डातील नागरिकांनी नगर परिषदेकडे केली आहे.
बॉक्स
समस्यांचे माहेरघर तुकडोजी वाॅर्ड
राष्ट्रीय महामार्गालगत विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला लागून असलेल्या तुकडोजी वाॅर्डात अनेक समस्या आहेत. वाॅर्डातील रस्ते दुरुस्ती, नाल्याची दुरुस्ती, स्वच्छता, रस्त्यावर उभी असलेली वाहने यासारख्या अनेक समस्या गेल्या कित्येक दिवसांपासून सतावत आहेत. मात्र याकडे नगरपरिषद जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप वाॅर्डातील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे बाकी काही नको किमान पाणीपुरवठा तरी तत्काळ सुरू करा अन्यथा वॉर्डातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.