वन्यप्राणी पाण्यासाठी सैरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:37 AM2021-04-20T04:37:05+5:302021-04-20T04:37:05+5:30

भंडारा : उन्हाळ्यात जंगलातील जलस्रोत आटल्याने वन्यप्राणी सैरभर झाले असून, पाण्याच्या शोधात शेतशिवारात शिरत आहेत. यातून हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यांवर ...

Wandering for wildlife water | वन्यप्राणी पाण्यासाठी सैरभर

वन्यप्राणी पाण्यासाठी सैरभर

Next

भंडारा : उन्हाळ्यात जंगलातील जलस्रोत आटल्याने वन्यप्राणी सैरभर झाले असून, पाण्याच्या शोधात शेतशिवारात शिरत आहेत. यातून हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करत आहेत. दोन दिवसांपूर्वी लाखांदूर तालुक्यात घडलेली घटना याचेच उदाहरण आहे. उन्हाळ्यात जंगलातील नदी, नाले, आटले असून, पाणवठ्यातही पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. हिंस्त्र प्राणी शेतशिवारात शिरत आहेत. लाखनी तालुक्यात एका अस्वलाने तीन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले होते. हे अस्वल चारा आणि पाण्याच्या शोधात भटकत असल्याची माहिती आहे. अशीच अवस्था जंगलालगतच्या शेतशिवारांची आहे. तृणभक्षी प्राणी शेतशिवारात शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. अनेकदा त्यांची शिकारही होत असल्याचे दिसून येते. वन विभागाने पाणवठ्यात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Wandering for wildlife water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.