प्रभाग रचना प्रारूप यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:33 AM2021-08-29T04:33:38+5:302021-08-29T04:33:38+5:30
अनेक नगर परिषद, नगर पंचायतीची क्षेत्रवाढ झाल्याने वॉर्ड निर्मीती करून येथील रहिवाशांना निवडणुकीच्या प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश आहे. ...
अनेक नगर परिषद, नगर पंचायतीची क्षेत्रवाढ झाल्याने वॉर्ड निर्मीती करून येथील रहिवाशांना निवडणुकीच्या प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश आहे. याबाबतची कारवाई राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औदयोगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ४१(१) नुसार करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदर कारवाई करण्यात येणार असून ६ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार 'अ' वर्ग नगर परिषदेच्या प्रारूप व अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोग मान्यता देईल, 'ब' नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेस जिल्हाधिकारी तसेच 'क' वर्गाच्या नगर परिषद व नगर पंचायतीच्या प्रारूप रचनेस जिल्हाधिकारी तर अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त मान्यता देतील. प्रस्तुत प्रक्रियेनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.