तुमसरात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Published: June 22, 2016 12:28 AM2016-06-22T00:28:45+5:302016-06-22T00:28:45+5:30

जिवनदायनी वैनगंगेचे पाणी आटल्याने तुमसर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या मोटार पंपात रेती शिरली व तांत्रीक बिघाड झाला त्यामुळे नळांना पाणी आलेच नाही.

Warm water for you | तुमसरात पाण्यासाठी हाहाकार

तुमसरात पाण्यासाठी हाहाकार

Next

श्रीरामनगरातील बोअरवेल बंद : तुमसरकरांना सोडले वाऱ्यावर, नगरसेवकांचा आरोप
तुमसर : जिवनदायनी वैनगंगेचे पाणी आटल्याने तुमसर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या मोटार पंपात रेती शिरली व तांत्रीक बिघाड झाला त्यामुळे नळांना पाणी आलेच नाही. तर दुसरीकडे संपुर्ण शहराला पाणी पुरवठा करणारी श्रीराम नगरातील बोअरवेलच्या पंपात बिघाड आला. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा होवू शकत नसल्यामुळे तुमसरात पिण्याच्या पाण्यासाठी गत दोन दिवसापासून हाहाकार माजला. असतांना मुख्याधिकाऱ्यानि मात्र कार्यालयातून लापता राहून तुमसरकरांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप संतप्त नगरसेवकांनी केला आहे.
पावसाने दगा दिल्याने तालुक्यातील सर्व तलाव, विहिरीने तळ गाढले. साधारणत: मार्च महिण्यापासून उन्हाळ्याला सुरुवात होत असते. मात्र तुमसर तालुक्यात डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची चणचण भासणे सुरु झाली. मात्र जिवनदायनी वैनगंगेने तुमसरकरांना ती चणचण भासू दिली नव्हती. परंतू जसजसी उष्णता वाढू लागली तसतसी वैनगंगाही आटू लागताच न.प. ने पाण्याचे स्त्रोत बदलविले व पाणी पुरवठा केला. दरम्यान तुमसरातील नगरसेवकांनीही पाण्याचा धर्म पाळत. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये. म्हणून टँकरची व्यवस्था करुन श्रीराम नगरातील बोअरवेल पाणी शहरात वाटप केले.
निवडणुकीचा अपवाद वगळता नगरसेवक मौलाचे कार्य करीत होते. त्यामुळे मुख्याधिकारी हे बेफिर होवून वावरत होते. त्यामुळे कार्यालयात दोन दोन तिन तिन दिवस गैरहजर राहणे हे त्यांच्या नित्याचे झाले. एकीकडे नागरिकांकडून पाणी पट्टी कराच्या नावावर कडक मोहीम राबवून जबरान कर वसूली करण्यात आली पंरतु न.प. प्रशासनाची शहरात एकही कर वसूली पथक फिरकले नाही. खुद नगरसेवकांनी पुढाकार धेवून व पैसे खर्च करुन पाणी वाटप करित असतांना मुख्याधिकाऱ्यांचा बेफिकीरपणा नगर सेवकांना पवनी व पडल्याने नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच रोष दर्शविला होता व पुढे येणाऱ्या अडचणीही सांगितल्या होत्या. परंतू मुख्याधिकारी गुल्हाणे यांनी कानाडोळा केला व आजघडीला तुमसर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगेचे पात्र आटले व मोटारपंपात रेती शिरल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. तर दुसरीकडे ज्या बोअरवेल मधील पाणी टँकरमध्ये भरला जायचा तिचीही मोटार बंद पडल्याने टँकरनेही पाणी पुरवठा बंद झाला आहे. असे असताना मुख्याधिकारी लापता आहेत. त्यावरुन मुख्याधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत हे दिसून आले. आहे. असा आरोप पक्षनेता प्रमोद तितीरमारेनी पिण्याच्या पाण्याची समस्या ही जर वेळीच निकाली निघाली नाही तर तुमसर न.प. वर काँग्रेसच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांची प्रतिक्रिया घेण्याबाबत दुरध्वनी केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Warm water for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.