भंडारात अतिवृष्टी होताच सखल भागांत साचते पाणी, उपाययोजनांकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:35 AM2021-07-29T04:35:03+5:302021-07-29T04:35:03+5:30

भंडारा : शहरात अतिवृष्टीत केवळ वैनगंगा नदीला पूर आल्यास सखल भागांत पाणी शिरते. वेळप्रसंगी अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले जाते. ...

Water accumulates in low lying areas as soon as there is excess rain in the reservoir | भंडारात अतिवृष्टी होताच सखल भागांत साचते पाणी, उपाययोजनांकडे कानाडोळा

भंडारात अतिवृष्टी होताच सखल भागांत साचते पाणी, उपाययोजनांकडे कानाडोळा

Next

भंडारा : शहरात अतिवृष्टीत केवळ वैनगंगा नदीला पूर आल्यास सखल भागांत पाणी शिरते. वेळप्रसंगी अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले जाते. यात विशेषत: ग्रामसेवक कॉलनी, काजीनगर, न्यू गौतम बुद्ध वॉर्ड, प्रगती कॉलनी परिसर, भोजापूर, आदी भागांचा समावेश असतो. ऑगस्ट २०२० आलेल्या महापुराने अनेक कुटुंबांना झळ बसविली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या वर्षी अतिवृष्टी किंंवा पुराने कुणी बाधित झाल्यास याबाबत पूर्ण तयारी केली असल्याचे दिसून येते.

बॉक्स

शहरातील पाणी साचणारी ठिकाणे

शहरात अनेक ठिकाणी पाणी साचत असते. शहरात कोणत्याही प्रमाणात नागरी वस्तीचे नियोजन नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने हा भाग उंच स्वरूपात आहे; तर शहराच्या सभोवतालचा परिसर खोलगट असल्याने विशेषत: ग्रामसेवक कॉलनी, भोजापूर, बेला, नागपूर नाका, टाकळी भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते.

बॉक्स

निधीची वानवा कायम

पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत उपाययोजना करण्यात येतात. या वर्षी जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सूक्ष्म नियाेजन केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सर्व घटक सदस्यांना त्यांच्या कार्याची माहितीही आधीच देण्यात आली आहे. यापूर्वीच्या बाबतीत मात्र कधीही असे सूक्ष्म नियोजन झाले नाही. तेव्हाही निधीची वानवा कायम होती. यावेळी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत निधीची तरतूद केल्याचे समजते. मात्र अजूनपर्यंत पूर परिस्थिती उद‌्भवलेली नाही.

कोट

गतवर्षीच्या महापुरात होत्याचे नव्हते झाले. अनेकांचे बरेच साहित्य वाहून गेले. मात्र त्यांना हव्या त्या प्रमाणात मदत दिली गेली नाही. आजही भोजापूर व आनंदनगरातील कुटुंबे महापुराच्या तडाख्यातून पूर्णत: सावरली नाहीत. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- अशोक उके

कोट

महापुरात अनेक कुटुंबांना तडाखा बसला. यावेळीही योग्य नियोजन झाले नाही तर सखल भागांत पाणी शिरून नुकसान होऊ शकते. वेळप्रसंगी कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविणे व साहित्याची राखण झाल्यास त्यांना तेवढी मदत होईल.

- शाहीद शेख

Web Title: Water accumulates in low lying areas as soon as there is excess rain in the reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.