आंदोलनाचा इशारा देताच दोन तासात पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:38 PM2018-10-01T21:38:34+5:302018-10-01T21:38:55+5:30

बावनथडी प्रकल्पाचे पाणी सिंचनाकरिता मिळत नसल्याने देव्हाडी, शिवारात धानपीक धोक्यात आले आहे. पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रकल्प अधिकाऱ्यांना देताच अवघ्या काही तासात पाणी सोडण्यात आले. सोमवारी जि.प. माजी सदस्य देवसिंग सव्वालाखे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना देव्हाडी येथे घेराव घातला होता. त्यानंतर पाणी सोडण्याची कारवाई करण्यात आली.

Water alert in two hours after warning of agitation | आंदोलनाचा इशारा देताच दोन तासात पाण्याचा विसर्ग

आंदोलनाचा इशारा देताच दोन तासात पाण्याचा विसर्ग

Next
ठळक मुद्देदेवसिंग सव्वालाखे : देव्हाडी, चारगाव, सुकळी, माडगी गावांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बावनथडी प्रकल्पाचे पाणी सिंचनाकरिता मिळत नसल्याने देव्हाडी, शिवारात धानपीक धोक्यात आले आहे. पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रकल्प अधिकाऱ्यांना देताच अवघ्या काही तासात पाणी सोडण्यात आले. सोमवारी जि.प. माजी सदस्य देवसिंग सव्वालाखे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना देव्हाडी येथे घेराव घातला होता. त्यानंतर पाणी सोडण्याची कारवाई करण्यात आली.
बावनथडी प्रकल्प तयार होवून चार वर्षे पूर्ण झाली, परंतु देव्हाडी शिवारातील सुकळी, चारगाव, ढोरवाडा, माडगी तथा इतर जवळील शिवार नावे पाण्यापासून वंचित होती. सध्या धान गर्भावस्थेत आहे. पाण्याची धान पिकाला नितांत गरज आहे. उष्णतेमुळे पीके करपू लागली आहेत. मांगली गेट व कुशारी गेट बंद असल्याने देव्हाडी शिवारातील सहा गावे सिंचनापासून वंचित होती. प्रकल्प अधिकारी कालव्यांची, वितरिकेची टेस्टींग सुरू आहे म्हणून वेळ मारून नेत होती.
देवसिंग सव्वालाखे यांनी सोमवारी प्रकल्प अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला. प्रकल्प अधिकारी बावनकर देव्हाडी येथे तात्काळ दाखल झाले. येथे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. चर्चेनंतर बावनकर यांनी वरिष्ठ अधिकाºयांना आंदोलनाची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले. केवळ दोन तासात बावनथडी प्रकल्प अधिकाºयांनी धान पिकाकरिता पाणी सोडले. यावेळी पांडूरंग मुटकुरे, गुड्डू मसरके, ज्ञानी मसरके, बाल्या सेलोकर, पिंटू सिंग, रवि ढबाले, पप्पु सेलोकर, सुरेश चौधरी, अरविंद बोंदरे, मुकेश मुटकुरे, सरपंच ज्ञानेश्वर भोयर, गेंदू बिरवारे, लल्लू दमाहे, विजू मसरके, राजू दमाहे, सुरेश लिल्हारे, अनेक शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Water alert in two hours after warning of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.