कालव्यातील पाणी गळतीने वैरण सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 05:00 AM2020-12-20T05:00:00+5:302020-12-20T05:00:52+5:30

  तुलसीदास रावते   लोकमत न्यूज नेटवर्क पवनारा : बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याला गळती लागली असून शेकडाे एकरात पाणी साचले आहे. ...

The water in the canal leaked and the fodder rotted | कालव्यातील पाणी गळतीने वैरण सडले

कालव्यातील पाणी गळतीने वैरण सडले

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : शेकडाे एकरात पाणीच पाणी

  तुलसीदास रावते 
 लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याला गळती लागली असून शेकडाे एकरात पाणी साचले आहे. शेतात असलेले वैरण या पाण्याने सडले असून आता जनावरांना चारा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे उन्हाळी धानासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी आंदाेलनाच्या प्रवित्र्यात आहे. 
आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्यावर माेठ्या प्रमाणात सिंचन केले जाते. परंतु गत दाेन महिन्यांपासून कालव्याच्या मुख्य गेटला गळती लागली आहे. हजाराे लिटर पाणी कालव्यातून वाहून जात आहे. कालव्यातील हे पाणी पाटसऱ्यांच्या माध्यमातून शेतात शिरत आहे. शेतात सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. विशेष म्हणजे धानाची मळणी झाल्यानंतर माेठ्या प्रमाणात वैरण शेतातच हाेते. या पाण्याने तणसाचे ढिग सडले आहे. अशा परिस्थतीत वर्षभर जनावरांचा चारा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी धानाचे कडपा ओले झाल्याने शेतकऱ्यांना माेठा फटका बसला हाेता. आधीच निसर्गाच्या दृष्टचक्राने शेतकरी हतबल झाला आहे. मात्र बावनथडी प्रकल्पाचे अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी कृष्णकुमार रहांगडाले म्हणाले, आधी धानकडपा आणि आता तणस ओले हाेत आहे. वर्षभर जनावरांचा चारा कसा पुरवायचा असा प्रश्न असल्याचे सांगितले. बावनथडी प्रकल्पाच्या भाेंगळ कारभाराने शेतकरी त्रस्त झाल्याचे सरपंच प्रतिमा अशाेक ठाकूर यांनी सांगितले. 
२४ डिसेंबरला  बघेडा येथे आंदाेलन 
एकीकडे पाण्याचा अपव्यय हाेत असताना कारली वितरिकेवरील शेतकऱ्यांना उन्हाळी धानासाठी पाणी मिळत नाही. बावनथडीचे पाणी सिंचनासाठी साेडले नाही तर २४ डिसेंबर राेजी बघेडा येथे आंदाेलन करण्याचा इशारा सरपंच प्रतिमा ठाकूर, उपसरपंच गाेपीचंद गायकवाड, सदन चाैधरी, कृष्णकुमार रहांगडाले, रतनलाल पारधी, दिनदयाल बिसने यांनी दिला आहे.

पाण्याचा अपव्यय
गत दोन महिन्यांपासून कालव्याच्या मुख्य गेटमधून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत असून दुसरीकडे शेतकरी सिंचनासाठी पाणी मागत आहेत. मात्र त्यांना सिंचनासाठी पाणी सोडले जात नाही. प्रकल्प प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे एकीकडे शेतकरी पाण्यासाठी आंदोलनाची भूमीका घेत आहेत तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

Web Title: The water in the canal leaked and the fodder rotted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.