बदलत्या काळानुसार जलसंवर्धन ही सर्वात महत्त्वाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 AM2021-03-24T04:33:18+5:302021-03-24T04:33:18+5:30

जिल्हास्तरावर जिल्हा कक्षाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर ...

Water conservation is the most important need in the changing times | बदलत्या काळानुसार जलसंवर्धन ही सर्वात महत्त्वाची गरज

बदलत्या काळानुसार जलसंवर्धन ही सर्वात महत्त्वाची गरज

Next

जिल्हास्तरावर जिल्हा कक्षाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर जिल्हा कक्षाचे तज्ज्ञ अजय गजापुरे, अंकुश गभने, हेमंत भांडारकर, राजेश येरणे, बबन येरणे, गजाजन भेदे, प्रशांत फाये, आदित्य तायडे, निखील वंजारी आदींची उपस्थिती होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांनी जल शपथ देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. पिण्याच्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम ग्रामस्तरावर राबविण्याचे आवाहन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांनी जल शपथ देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. पिण्याच्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम ग्रामस्तरावर राबविण्याचे आवाहन केले.

भंडारा पंचायत समितीत गट विकास अधिकारी नूतन सावंत यांचे प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी जलशपथ देऊन पिण्याच्या पाण्याची शुध्दता आणि स्त्रोतांची स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले. मोहाडी येथे गट विकास अधिकारी वंजारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. त्यांनी पंचायत समिती स्तरावर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना जल शपथ दिली. तसेच तुमसर पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या जल शपथ आणि सप्ताह शुभारंभ कार्यक्रमात गट विकास अधिकारी धीरज पाटील यांनी अधिकारी, कर्मचारी यांना पाणी बचतीबाबत शपथ दिली आणि ग्रामस्तरावर पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकांनी आपला सहभाग दर्शवण्याचे आवाहन केले.

लाखनी येथे गट विकास अधिकारी डॉ. जाधव, साकोली येथे गट विकास अधिकारी नीलेश वानखडे तर लाखांदूर येथे गट विकास अधिकारी जी.पी. अगरते यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. कर्मचाऱ्यांना जलशपथ देऊन पिण्याच्या पाण्याचे महत्त्व सांगण्यात आले. तर पवनी येथे गट विकास अधिकारी वाळूंज मॅडम यांनी कर्मचाऱ्यांना शपथ दिली. २२ मार्च ते २७ मार्च या कालावधीमध्ये पाण्याचे महत्व, पाणी पुरवठ्यासाठी वापरात येणारे जलस्रोत यांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी योजनांमधील पाणी गळती थांबविणे गरजेचे आहे. पाणी शुद्धता , पाणी वाचवा, पाणी सुरक्षितता आदीबाबत तालुक्यात गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत स्तरावर सप्ताहभर विविध उपक्रम राबविणार आहेत.

बॉक्स

२२ मार्चला जलशपथ आणि जलसप्ताहाचा शुभारंभ ग्रामपंचायत, शाळा , अगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे, २४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजिटल माध्यमांचा वापर करून समजावून सांगणे, २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दूषित आलेल्या स्त्रोतांचे उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे, २६ मार्च रोजी पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल, २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे, शून्य गळती मोहीम, नादुरुस्त स्त्रोत दुरुस्त करणे आदी उपक्रम राबविले जातील. दरम्यान, सदरचे उपक्रम राबविताना कोरोना प्रतिबंधक नियमानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Web Title: Water conservation is the most important need in the changing times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.