जलसाठ्यात ११ टक्क्यांची घट

By admin | Published: September 17, 2015 12:34 AM2015-09-17T00:34:04+5:302015-09-17T00:34:04+5:30

जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे ...

Water consumption dropped by 11 percent | जलसाठ्यात ११ टक्क्यांची घट

जलसाठ्यात ११ टक्क्यांची घट

Next

पावसाचा अनियमितपणा : धानाला पाण्याची आवश्यकता
भंडारा : जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ५५ टक्के पाण्याचा साठा आहे. मागील वर्षी १६ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात ६६.४७ टक्के जलसाठा होता. मात्र, पाऊस कमी पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलसाठयात ११ टक्क्यांनी घट झाली आहे.
लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे.
सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ४९.९५, बघेडा ६१.९९४ टक्के जलसाठा आहे. बेटेकर ४0.६४ टक्के व सोरना जलाशयात फक्त २२.२८ टक्केच पाणी असून चारही मध्यम प्रकल्पात ४६.७२ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी चार मध्यम प्रकल्पात १६ सप्टेंबरपर्यंत ६२.८५ टक्के जलसाठा शिल्लक होता.
जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सद्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ५४.६२ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ७२.८२ टक्के आहे.
३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरमडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कातुर्ली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा असला तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे. अनेक भागात नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा संपण्याचा स्थितीत असतानाही जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ ६७.७३० दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी च्या तुलनेत यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यात प्रकल्पात अल्प प्रमाणात पाणी असल्याने जनावरांसह वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा ठरणारी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Water consumption dropped by 11 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.