जलशुद्धीकरण केंद्र परिसरात पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:54 PM2019-04-15T22:54:47+5:302019-04-15T22:55:03+5:30

भंडारा जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून सर्वत्र पाणीटंचाई सदृश स्थिती आहे. तुमसर शहरात मात्र जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मागील २२ महिन्यापासून 'व्हॉल्व' लीकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. व्हॉल्व लीकेज दुरुस्ती न केल्याने पाण्याचा दररोज अपव्यय सुरू आहे. जल हे जीवन आहे, असे केवळ कामगदावर येथे दिसत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या कारभारामुळे पाणी व्यर्थ जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Water disruption in the water purification center area | जलशुद्धीकरण केंद्र परिसरात पाण्याची नासाडी

जलशुद्धीकरण केंद्र परिसरात पाण्याची नासाडी

Next
ठळक मुद्देतुमसर येथील प्रकार : गत २२ महिन्यांपासून जुन्या व्हॉल्वमधून पाण्याची गळती, तुमसर शहरात पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भंडारा जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून सर्वत्र पाणीटंचाई सदृश स्थिती आहे. तुमसर शहरात मात्र जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मागील २२ महिन्यापासून 'व्हॉल्व' लीकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. व्हॉल्व लीकेज दुरुस्ती न केल्याने पाण्याचा दररोज अपव्यय सुरू आहे. जल हे जीवन आहे, असे केवळ कामगदावर येथे दिसत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या कारभारामुळे पाणी व्यर्थ जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
तुमसर शहराला पाणीपुरठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मागील २० ते २२ महिन्यापासून व्हाल्वमधून पाण्याची गळती सुरू आहे. व्हाल्व दुरूस्ती न केल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी सुरू आहे. येथील व्हाल्व व जलवाहिन्या अनेक वर्षे जुनी आहेत. अनेकांचे आयुष्य संपले आहे. परंतु किमान तज्ञ तंत्रज्ञांना पाचारण करून तात्पुरती दुरूस्ती करण्याची गरज येथे आहे.
तुमसरकरांकरिता नवीन जलवाहिनी, जलकुंभाची कोट्यवधीची योजना मंजूर करण्यात आली असून युद्धस्तरावर पाणीपुरवठा योजनेची कामे मागील सहा ते आठ महिन्यापासून सुरू आहेत. कवलेवाडा बॅरेजमधून येथे पाणीपुरवठा केला जाणार आहे. जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मोठे व्हाल्व आहेत. ही पाईपलाईन जुनी व बीड या धातूपासून बनली आहे. सदर व्हाल्वमधून नियमित पाणी गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दररोज हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असून पाणी व्यर्थ वाया जात आहे.
सदर व्हाल्वची दुरूस्ती करण्याचा प्रयत्न येथील कर्मचारी, अभियंत्यांनी केला, परंतु त्यात यश आले नाही, अशी माहिती आहे. पुन्हा संपूर्ण दुरूस्तीकरिता शहराचा पाणीपुरवठा बंद करावा लागतो. सध्या उन्हाळा सुरू आहे. आता दुरूस्तीची कामे सुरू केली तर शहरात पाण्याकरिता हाहाकार माजेल. मुख्य व्हाल्व असल्याने व जीर्ण जलवाहिनी असल्याने दुरूस्ती करणे येथे तारेवरची कसरत आहे. पालिका प्रशासनही येथे हतबल दिसत आहे. मौल्यवान पाण्याचे जपून वापर करावा, असे सांगण्यात येते. व्यर्थ पाणी कसा जात असल्याने समाजमन सुन्न निश्चित होते.
गत २२ महिन्यापासून व्हाल्व लिकेज असल्याचे माहित असताना आता हातवर केले जात आहे. नगर पालिका प्रशासनाने येथे मार्ग काढून दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता महेंद्र देवडे यांनी केली आहे.

Web Title: Water disruption in the water purification center area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.