बावनथडीच्या पात्रातून उपयोगाविना पाण्याचा विसर्ग

By admin | Published: July 13, 2016 01:37 AM2016-07-13T01:37:01+5:302016-07-13T01:37:01+5:30

बावनथडी नदी पात्रातून पाणी ओसरले असतानाही सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा खंडीत वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.

Water flow without use of bavanathidi leaves | बावनथडीच्या पात्रातून उपयोगाविना पाण्याचा विसर्ग

बावनथडीच्या पात्रातून उपयोगाविना पाण्याचा विसर्ग

Next

प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा बंद : धरणाचे दरवाजे उघडेच, १६ व २३ ला सिहोऱ्यात ‘रस्ता रोको’ आंदोलन
चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदी पात्रातून पाणी ओसरले असतानाही सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा खंडीत वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. यामुळे नदी पात्रातून पाण्याचा उपयोगाविना विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पावरून विरोधक व सत्ताधारी आक्रमक झाले आहेत.
सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर शेती ओलीताखाली आणण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आला. या प्रकल्पाने नदी पात्रातून उपसा केलेले पाणी चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. यामुळे हा प्रकल्प पावसाळ्यात महिनाभर नदी पात्रातून पाण्याचा उपसा करीत आहे. वर्षभरापासून प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत आहे. ३५ लाख ९३ हजार रूपयांचा वीज देयकांची थकबाकीमुळे महावितरणने वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान राज्य शासनाने चितळे समितीच्या शिफारसी लागू केल्याने पाणी पट्टी करांच्या वसुलीमधून वीज देयक भरण्याचे निर्देशीत केले आहे. यामुळे पाटबंधारे विभागाला ही जबाबदारी देण्यात आली आहे. परिसरातील शेतकऱ्यांकडे पाणी पट्टी करांचे ३ कोटी रुपये वसुली शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी विविध कारणे पुढे करीत पाणीपट्टी करांची वसुली प्रभावित केल्याने सोंड्याटोला प्रकल्पाचे विजेचे थकीत देयक भरण्यात आले नाही. यामुळे यंदा प्रकल्प पाण्याचा उपसा करणार नाही. असे निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान थकीत विजेचे देयक भरण्यात आले नाही. यामुळे प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करण्याचा कालावधी सुरु असताना अंधार पसरलेला आहे. पाणीपट्टी करांची वसुली मधून विजेचे देयक भरण्याचे अट लागू करण्यात आली आहे.
मागील पंधरवाड्यात बावनथडी नदीपात्रातून तीन पुराचे पाणी ओसरले आहे. प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाचे दरवाजे उघडे आहे. पुराचे पाणी ओसरताच नदीच्या पात्रात पाण्याची वानवा आहे. नदीचे पात्रात तासाभरासाठी पुराचे पाणी राहत असल्याचा अनुभव आहे. या प्रकल्पस्थळात पॅनल विभागात पाणीचे पाणी असल्याने शॉर्ट सर्कीट होण्याची भीती आहे.
जलाशयात केवळ ८ फुट पाणी आहे. ओलीताखाली शेती आणण्यासाठी पावसाळा अखेर ३६ फुट पाणी साठवणूक करण्याची गरज आहे. यामुळे यंदा प्रकल्प स्थळात ठिकठाक नाही. असे चित्र आहे. दरम्यान प्रकल्प स्थळात खंडीत वीज पुरवठा सुरु करण्यासाठी विरोधक व सत्ताधारी आक्रमक झाले आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Water flow without use of bavanathidi leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.