‘वॉटर फुल-ग्रीन’ संकल्पना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:40 PM2018-04-29T22:40:45+5:302018-04-29T22:41:08+5:30

सकाळची पहाट, वृक्षांवर किलबिलणारे पाण्यात झेप घेऊन तृष्णा भागविणारे पक्षी हा नैसर्गीक अनुभव घेता यावा. पाऊलवाटा वृक्षानी आच्छादाण्या हा स्वप्न वर्षभरात मोहाडीमध्ये कृतीत उतरला नाही.

'Water Full-Green' concept is on paper | ‘वॉटर फुल-ग्रीन’ संकल्पना कागदावरच

‘वॉटर फुल-ग्रीन’ संकल्पना कागदावरच

Next
ठळक मुद्देप्रसिद्धीची हाव मोठी : श्रमदान झाले महाग, नित्याचाच प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : सकाळची पहाट, वृक्षांवर किलबिलणारे पाण्यात झेप घेऊन तृष्णा भागविणारे पक्षी हा नैसर्गीक अनुभव घेता यावा. पाऊलवाटा वृक्षानी आच्छादाण्या हा स्वप्न वर्षभरात मोहाडीमध्ये कृतीत उतरला नाही. त्यामुळे वॉटरफुल व ग्रीन मोहाडीची संकल्पना कागदावर अन् प्रसिद्धी पुरतीच होती काय असा सवाल मोहाडी करांना पडला आहे.
मागील वर्षी कामगार दिनाच्या मुहूर्तावर एक दिवस मोहाडीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. मोहाडीच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वॉटर फुल अ‍ॅन्ड ग्रीन प्रोजेक्ट राबविण्यात येणार होता. जलसंधारणाची चळवळ उभी व्हावी या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी मागील वर्षी १ मे रोजी तहसिल कार्यालयाच्या समोरील कोल्हापूरी बंधाऱ्याजवळ श्रमदान करण्यात आले होते. या श्रमदानामुळे तालुक्यातील गावांना उर्जा देण्याचे कार्य होणार होते. श्रमदानानंतर त्या जागेवरच मुठमाती दिल्याचे दिसते.
गाव हिताच्या पाणी टंचाईवर उपाय म्हणून केलेल्या श्रमदानाच्या प्रारंभानंतर वॉटर फुल अ‍ॅन्ड ग्रीन मोहाडीची संकल्पना साकार करायला पुढे कोणीही आले नाही. तुमसर-मोहाडी क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे, तत्कालीन तहसिलदार धनंजय देशमुख, उपविभागीय अधिकारी शिल सोनुले, गटविकास अधिकारी किशोर पात्रीकर तसेच गावातील नगराध्यक्ष, नगरसेवक, युवक मंडळी, पत्रकार, महिला, युवती आदी जणांनी श्रमदानात सहभाग नोंदविला होता. श्रमदानानंतर जनप्रतिनिधी आमदार चरण वाघमारे, तहसलिदार धनंजय देशमुख यांचे मे महिन्यात स्थानांतरण झाले. त्यामुळे ही शाश्वत पाणी टंचाईवर मात करण्याची संकल्पना जागेवरच राहिली. व्यक्ती बदलल्या की सगळंच काही बदलत जाते. या बदलाचा परिणाम मोहाडी करांना भोगावा लागला.
या सामाजिक हिताच्या कार्याला प्रारंभापूर्वीच मृतरूप बघायला मिळाले. तत्कालीन तहसिलदार देशमुख स्थानांतरीत झाले. दुसरे तहसिलदार सुर्यकांत पाटील आले. तहसिलदार, कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी मोहाडीचा विचार केला असता सकारात्मक पाऊले उचलली असती तर संकल्पना साकारण्यासाठी पुढची दिशा ठरविली असती, पुढाकार घेतला असता तर आमदार वाघमारे यांनी नक्कीच या नाविण्यपुर्ण कार्याला गती देण्यासाठी मदत केली असती. पण सारेच प्रशासनातील अधिकारी श्रमदानाच्या देखाव्या, झगमगाटानंतर या कार्यारंभासाठी दिशा ठरविताना कुठेच दिसली नाही.
आज मोहाडीकरांना पिण्याचा पाण्यासाठी तरसावे लागते. तीन तीन दिवस नळ कोरडे असतात. पैसा देवून पाणी खरेदी करावे लागते. नगरपंचायतला मोहगाव देवीच्य सुर नदीवरउपाय योजना करण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो, असे तत्कालीन बंधाºयासाठी पैसा वाचावा यासाठी श्रमदानाची कल्पना प्रशासनाला सुचत नाही. पाण्यासाठी श्रमदान महाग झाला काय असा प्रश्न पडतो. १ मे हा एक दिवस मोहाडीसाठी राबविलेला उपक्रम दिशा देणारा होता, असेच म्हणावे लागेल.

बदली झाल्याने त्या प्रोजेक्टरवर काम करण्याची संधी मिळाली नाही. आजही त्या प्रकल्पावर अंमलबजावणी करता येवू शकते. मोहाडीकरांनी सहभाग घ्यावा व आपुलकी निर्माण करावी.
-धनंजय देशमुख,
तत्कालीन तहसिलदार मोहाडी.

Web Title: 'Water Full-Green' concept is on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.