वैनगंगा बॅरेजमधून उद्योग समूहाला दिले जाते पाणी
By admin | Published: May 5, 2016 12:56 AM2016-05-05T00:56:54+5:302016-05-05T00:56:54+5:30
एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना वैनगंगेवरील बॅरेजमधून एका मोठ्या उद्योग समूहाला पाणी देणे सुरू असल्याचा प्रकार
मांडवी-धापेवाडा बॅरेज : खासदारांची चौकशीची मागणी
तुमसर : एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना वैनगंगेवरील बॅरेजमधून एका मोठ्या उद्योग समूहाला पाणी देणे सुरू असल्याचा प्रकार मागील सहा दिवसांपर्यंत सुरू होता. कागदोपत्री पाणी बंद आहे तर प्रत्यक्षात बॅरेजमधून पाण्याचा उपसा सुरू होता. राज्य शासन व या उद्योग समूहाने चार वर्षापूर्वी वैनगंगा नदीवर मांडवी-धापेवाडा बॅरेज तयार केले होते. वैनगंगा नदी कोरडी पडली आहे. पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहेत. बॅरेजमधून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.
एप्रिल महिन्यात या बॅरेज धरणात १० एमएम क्युब पाणी शिल्लक होते, परंतु सद्य स्थितीत केवळ ३ एमएम क्युब पाणी शिल्लक आहे. उर्वरित पाणी येथे कुठे, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
२.५ एम.एम. क्युब पाणी १२ पाणीपुरवठा योजनेकरिता शिल्लक ठेवायचे आहे तर ५ एमएम क्युब पाणी शेतकऱ्यांकरिता राखीव ठेवायचे आहे. ३ एमएम क्युब पाणी बॅरेज मध्ये उपलब्ध असतानी पाण्याची उचल एका मोठा उद्योग समूहाने कशी केली. हा मुख्य प्रश्न आहे.
१६ एप्रिल रोजी धापेवाडा सिंचन प्रकल्प अधिकाऱ्यांनी अदानी वीज समूहाला पाण्याचा उपसा बंद करण्याचे पत्र दिले होते. २४ एप्र्रिल पासून अदानी समूहाने पाण्याचा उपसा बंद केला, अशी माहिती अदानी समूहाने प्रकल्प अधिकाऱ्यांना दिली परंतु वास्तविक स्थिती येथे दुसरीच होती. अदानी समूहाला या बॅरेजमधून १.५ एम एम क्युब पाणी देण्यात येते.
२० एप्रिलच्या रात्रीपर्यंत बॅरेजमधून पाणी उपसा सुरू होता, अशी माहिती आहे. दरवर्षी ७ कोटी ५० लक्ष अदानी समूह शासनाला पाणी उपशाचे देते अशी माहिती आहे. अदानी वीज समूह व इतर पाणीपुरवठा योजनेकरिता बावनथडी प्रकल्पातून पाणी देण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. परंतु बावनथडी प्रकल्पात केवळ १० टक्के मृत जलसाठा उपलब्ध असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
बावनथडी धरणातील पाणी साठ्यावर मध्य प्रदेश शासनाचे नियंत्रण आहे. भंडारा व बालाघाटचे जिल्हाधिकारी संयुक्त निर्णयानंतरच पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये
भंडारा : गायत्री एज्युकेशन सोसायटी, नागपूर व्दारा संचालित गायत्री पब्लिक स्कूल विद्यानगर, गुजराथी कॉलनी, गणेशपूर भंडारा येथे इंग्रजी माध्यमाचे वर्ग १ ते ६ हे अनधिकृत सुरु आहेत. सदर वर्गाला शासनाची मान्यता नाही, अशा अनधिकृत शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. सदर वर्गात प्रवेश घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालक व विद्यार्थ्यांची राहील, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. यांनी कळविले आहे.
१६ एप्रिल रोजी अदानी समूहाला पाणी उपसा बंद करण्याचे पत्र दिले होते. २४ एप्रिल रोजी अदानी समूहाने पाणी उपसा बंद केला. नियमानुसार येथे कामे होतात. कागदोपत्री कामे होत नाही.
-पद्माकर यासटवार, कार्यकारी अभियंता, तिरोडा.
बावनथडी धरणात केवळ १० टक्केच मृत पाण्याचा साठा आहे. पाणीपुरवठा योजनेकरिता पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ते शक्य आहे. धरणावर मध्यप्रदेश शासनाचे नियंत्रण आहे.
-आय.बी. राठोड, उपविभागीय अभियंता तुमसर.