चौरास भागात पाण्याची पातळी घसरली
By admin | Published: October 12, 2015 01:14 AM2015-10-12T01:14:20+5:302015-10-12T01:14:20+5:30
चौरास भागात सध्याचे मोसम जीवघेणे ठरत आहे. १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तसेच पावसाळा ऋतूसारखा वाटला नाही.
कोंढा कोसरा : चौरास भागात सध्याचे मोसम जीवघेणे ठरत आहे. १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तसेच पावसाळा ऋतूसारखा वाटला नाही. त्यामुळे नदी, नाले, तलाव यांना पूर आले. जमिनीत पाणी साचले नसल्याने पाण्याची पातळी खोल गेली असून सिंचन सुविधा असलेले शेतकरी देखील उन्हाळी धान पिक घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या कोंढा परिसरात पावसाळ्यात ३८ ते ४० अंश तापमान आहे. पावसाची वाट पाहून शेतकऱ्यांचे डोळे उणेमुळे तापून गेले. पण पाऊस पडत नाही. या हंगामात पाऊस अत्यल्प पडल्याने तलाव, नाले, नदी यांना पूर आले नाही. शेतात देखील दीर्घकाळ पाऊस न पडल्याने पाणी साचले नाही. म्हणून पावसाचे पाणी जमिनीत मुरलेन ाही. जमिनीची उष्णता न निघाल्याने वातावरण उन्हाळ्यासारखे वाटत आहे. सध्या सिंचन विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली असून शेतकरी कसेतरी धानाचे पीक वाचवीत आहे. पण येणाऱ्या उन्हाळ्यात पुन्हा उन्हाळी धान पिकणे अशक्य असल्याचे अनेक शेतकरी बोलत आहेत. मागील तीन वर्षापासून चौरास भागात अत्यल्प पडत असल्याने चौरास भागाचा वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी चौरास भाग सुजलाम् सुफलाम समजले जात असे. पण सध्या पाण्याची पातळी अतीशय खोल गेल्याने कृषी पंपधारक शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसते .पाण्याची पातळी खोल गेल्याने आधीच शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करणे कमी केले आहे. येणाऱ्या काळात या भागात पिण्याच्या पाण्याची देखील तीव्र समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
गोसे प्रकल्पाचे पाणी सध्या चौरास भाग समजलेल्या कोंढा येथून डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोडले जात आहे. या कालव्याचे पाणी चौरास भागातील नाले, तलाव यामध्ये तुडूंब भरून ठेवल्यास उन्हाळ्यात पाण्याची समस्या काही प्रमाणात मिटू शकते. यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी एक आराखडा तयार करून काम करणे आवश्यक आहे. कोंढा, सोमनाळा, आकोट, चिचाळ, कोसरा, सेंद्री (खु), सेंद्री (बु.), रनाळा, खैरी (तेलोता), भावड, अत्री, फनोली अशी अनेक गावे डाव्या कालव्याच्या आजूबाजूला आहेत. या गावातील तलाव पावसाचे पाणी न आल्याने भरलेले नाही. तेव्हा उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या जाणवू शकते. अशावेळी गावच्या तलावात कालव्याचे पाणी साठवून ठेवणे हा पाणी समस्येवर एक उपाय होऊ शकते. (वार्ताहर)