जलाशय कारलीत, सिंचन आसलपाणीत
By admin | Published: December 24, 2014 10:54 PM2014-12-24T22:54:52+5:302014-12-24T22:54:52+5:30
कारली जलाशयाच्या पाण्याने गर्रा व आसलपानी या गावातील शेतीला सिंचनाचा लाभ होतो, परंतु ज्या गावात जलाशय कारली आहे. त्या गावातील सुपारी ६५ हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे.
तुमसर : कारली जलाशयाच्या पाण्याने गर्रा व आसलपानी या गावातील शेतीला सिंचनाचा लाभ होतो, परंतु ज्या गावात जलाशय कारली आहे. त्या गावातील सुपारी ६५ हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. यावर्षी येथील शेतकऱ्यांनी धानाचा मड्डा कापला. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत शेतकऱ्यांनी वाळलेल्या धानाच्या पेंढ्या दाखविल्या होत्या.
बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाचे पाणी या जलाशयात सोडून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळावा याचे नियोजन केले आहे. परंतु वितरिका नाही. त्यामुळे या कारली जलाशयात बावनथडी प्रकल्पाचे पाणी येत नाही. दोन वर्षापुर्वी स्थानिक सहकारी सोसायटीने दुरूस्ती केली होती. तेव्हा काही प्रमाणात या जलाशयात पाणी आले होते. कारली गाव उंचावर असल्याने या जलाशयाचा लाभ कारलीच्या शेतकऱ्यांना होत नाही. गर्रा व आसलपानी येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो. या गावाची आणेवारी महसूल विभागाने ५१-५२ पैसे काढली आहे. कारली गाव दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. कारली येथे जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली होती तेव्हा येथील ग्रामस्थांनी वाळलेले धान पिकांच्या पेंढ्या दाखविल्या होत्या. येथील काही बावनथडी प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळाला नाही. काहींना २५ हजार प्रतिएकर मोबदला मिळाला. असून मोबदला या नियमानुसार मिळेल व ते मला मान्य आहे, असे नमूद केले आहे. कारलीला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जि.प. सदस्य सुरेश रहांगडाले, प्रकाश लसुंते, विनोद गौरीकर, गोपी गायकवाड, प्रभू चौधरी, झाबू जैतवार यांनी केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)