जलसंपदा कार्यालय वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 06:00 AM2019-11-08T06:00:00+5:302019-11-08T06:00:48+5:30

देवानंद नंदेश्वर/इंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जलस्त्रोतांचा महत्तम क्षमतेने वापर करून प्रत्येक व्यक्ती तसेच पर्यावरण विषयक ...

Water Resources Office Winds | जलसंपदा कार्यालय वाऱ्यावर

जलसंपदा कार्यालय वाऱ्यावर

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांची दांडी : धरण, कालव्यांचा दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर

देवानंद नंदेश्वर/इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जलस्त्रोतांचा महत्तम क्षमतेने वापर करून प्रत्येक व्यक्ती तसेच पर्यावरण विषयक गरजा भागविणे हे जलसंपदा विभागाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मात्र येथील जलसंपदा विभाग व उपविभागाच्या अभियंत्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. दिवाळीच्या सुट्या संपल्या असल्या तरी अधिकाºयांच्या दांडीमुळे जलसंपदा विभागाच्या कार्यालयात गुरूवारी शुकशुकाट दिसून आला. अधिकारीच उपस्थित नसल्याने कनिष्ठ कर्मचाºयांवर कोणाचाही वचक नसल्याचे ‘लोकमत’ चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पुढे आले.
पाणी तंट्याची घंटा वाजत आहे आणि वेळेवर जर त्यावर उपाययोजना झाली नाही तर समाजामध्ये तणाव निर्मांण होऊ शकतो. म्हणून जलसंपदा विभागाने मर्यादित जलस्त्रोतामधून आधुनिक तंत्रज्ञान वापरून महत्तम कार्यक्षमतेने राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या दैनंदिन गरजेपुरते व त्यानंतर शेती, उद्योग, पर्यावरणविषयक गतीविधी यांच्यासाठी पुरेसे पाणी पुरविण्याचे काम हाती घेण्याचा मानस विभागाचा आहे. मात्र जर अधिकारीच याविषयी उदासीन दिसत असतील तर अशा अधिकाºयावर कारवाई होणे गरजेचे आहे.
‘लोकमत’ चमूने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जलसंपदा विभाग कार्यालय उपसा सिंचन यांत्रिकी विभाग व उपविभाग कार्यालयाला गुरूवारी भेट दिली. तेथे दुपारपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती दिसून आली. येथे कार्यकारी अभियंता समीर दाणी व उपविभागाचे अभियंता स्रेहल सोनटक्के आहेत. प्रमुख अधिकारीच जर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने त्यांचे अधिनस्त कर्मचारी देखील कार्यालयात दिसून आले नाही. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या पानटपरीवर मात्र काही नागरिक दिसून आले. राज्य शासनाअंतर्गत असलेल्या या विभागाचे दर्शन घेतल्यास 'अंधेर नगरी चौपट राजा'ची प्रचिती दिसून येते. या विभागाच्या प्रवेशव्दार नेहमीच बंद असते.
प्रवेशव्दाराच्या बाजुला असलेल्या रिकाम्या जागेतून आत प्रवेश केला जातो. दर्शनी भागात विभागाच्या नावाचा फलक आहे. त्याच्या बाजूला लाच मागणे गुन्हा आहे, असा फलक दिसून आला.
कार्यालयाच्या बाहेर निघताच एक इसम आढळला. त्याने चमूशी चर्चा केली. त्यांना अभियंत्यांसदर्भात विचारणा केली असता नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर येथे सर्व सावळागोंधळ असल्याचे सांगितले. त्यांना पूर्ण माहिती द्या म्हणताच लवकरच आपल्या कार्यालयात विभागाच्या भोंगळ कार्याची जंत्रीच देण्याचे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील उपसा सिंचन, धरणे व टेक्नीकल कामाची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास मोठे घबाड निघण्याची शक्यता आहे.

कार्यालय प्रमुखांचीच खुर्ची रिकामी
भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून जलसंपदा विभागाची जबाबदारी महत्वाची समजली जाते. मात्र जिल्ह्यातील प्रकल्प, धरणे, कालवे यांची परिस्थिती शेतकºयांना माहितच आहे. येथे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे कमी व कंत्राटदारांची मोठी रेलचेल असते. कोट्यावधी रूपयांचा निधी या विभागाकडे मिळत असला तरी याची विल्हेवाट योग्यपद्धतीने केली जाते काय, हा प्रश्न आपसुकच निर्माण होत आहे. या कार्यालयातील प्रमुख शिलेदारांची खुर्ची आठवड्याभरातून किती दिवस रिकामी असते हा शोध मोहिमेचा प्रश्न आहे.

आवारात अस्वच्छता
भंडारा शहरात असलेल्या जलसंपदा विभाग कार्यालयात कार्यकारी अभियंता उपसा सिंचन यांत्रिकी विभाग व उपअभियंता अभियांत्रिकी कर्मशाळा उपविभाग कार्यालयाच्या आवारात अस्वच्छतेचा विळखा आहे. आवारात झाडी-झुडूपे पसरलेली असून स्वच्छतेचे सौजन्य दिसून येत नाही. जिकडे तिकडे पालापाचोळा पसरलेला दिसून येते. राज्य शासनाचे महत्वाचे हे कार्यालय असले तरी या कार्यालयाचे रूप बघून जणू कोंडवाडाच असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. सगळीकडे स्वच्छतेचा नारा असला तरी येथे मात्र याला अपवाद आहे.

Web Title: Water Resources Office Winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.