बोरी वितरिका फुटली शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:00 AM2018-07-10T00:00:24+5:302018-07-10T00:00:44+5:30

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाºया बावनथडी प्रकल्पाची बोरी भूमिगत वितरिका फुटल्यामुळे वितरिकेचे पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे रोवणी झालेल्या उभ्या धानपिकाची नासाडी झाल्यामुळे बोरी वितरिका शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरली आहे.

The water sits in the sack area | बोरी वितरिका फुटली शेतात शिरले पाणी

बोरी वितरिका फुटली शेतात शिरले पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देधान पिकाची प्रचंड नासाडी

राहुल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाºया बावनथडी प्रकल्पाची बोरी भूमिगत वितरिका फुटल्यामुळे वितरिकेचे पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे रोवणी झालेल्या उभ्या धानपिकाची नासाडी झाल्यामुळे बोरी वितरिका शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरली आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरच्या जलसंपदा विभागाने बावनथडी प्रकल्पाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करून बोरी वितरिका साजा क्रमांक ३२०० मीटर ही भुभाग न खोदता जमिनीच्या आतून (भूमिगत) वितरिका तयार करण्याचे कंत्राट इंडियन होम पाईप कंपनी मुंबईला दिले. बोरी वितरिका तुमसर मांगली, तामसवाडी, तुडका, नवरगाव, उमरवाडा, बोरी, शिवणी, कोष्टी, बाम्हणी हे गाव ओलिताखाली येणार आहेत.
वितरिका तुमसर शहरातून नेताना तांत्रिक अडचणी असल्यामुळे देव्हाडी रोड मार्गावरील रायबहादूर हिंदी शाळेजवळ पुलाखालून पाईप लाईन टाकण्यात आली. ते टाकत असताना शेतकºयांचे नुकसान होणार नाही, अशी अट विभागाने घातली होती. त्याठिकाणी शेतकºयांनी मजबुत पाळ बांधून नाली खोदकाम करण्याची विनंती केले. पंरतु कपंनीच्या लोकांनी ती विनंती धुडकावून लावली होती. त्याचे पर्यावसन ही भूमिगत वितरिका कपंनीच्या गलथान कारभारामुळे फुटली.
परिणामी श्रमपाल कारेमोरे यांच्या १० एकर शेतात पाणी शिरले व रोवणी झालेल्या उभ्या धान पिकाची नासाडी झाली. विभागाच्या अधिकाºयांनी दखल घेऊन या शेतकºयाला दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी आणि वितरिका दोषमुक्त कार्य करण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

वितरिकेचे पाणी शिरल्याचे कळताच आमची चमू घटनास्थळी पोहचली. शेतात शिरलेले पाणी बाहेर कढून घटनेचा पंचनामा करून आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठविणार आहे.
- पी. व्ही. वाघमोडे, उपविभागीय अभियंता बावनथडी प्रकल्प.
१५० रूपये मजुरी देऊन रोवणीचे काम करवून घेतले होते. शेतात पाणी शिरल्याने आता सर्व काही गेल्याची स्थिती निर्मा झाली आहे.
- श्रमपाल कारेमोरे, शेतकरी.

Web Title: The water sits in the sack area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.