बावनथडी धरणातून मध्य प्रदेश राज्यात पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:59 PM2018-05-15T22:59:13+5:302018-05-15T22:59:13+5:30
बावनथडी धरणातून मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अनेक गावात जलसंकट निर्माण झाले होते. शेतीचे पिकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी मध्यप्रदेशातील मुख्य कालवा व वितरिकेत ५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातही जलसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील मुख्य कालवा व वितरीकेतपाणी विसर्ग करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बावनथडी धरणातून मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अनेक गावात जलसंकट निर्माण झाले होते. शेतीचे पिकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी मध्यप्रदेशातील मुख्य कालवा व वितरिकेत ५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातही जलसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील मुख्य कालवा व वितरीकेतपाणी विसर्ग करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
२९ एप्रिल रोजी बावनथडी नदीत ८ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात जलसंकट व शेती पिकांकरिता बावनथडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.
त्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी १ वाजता ३ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. संध्याकाळी पुन्हा २ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
तुमसर व मोहाडी तालुक्यात सध्या जलसंकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील मुख्य कालवा व वितरिकेत बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. सदर प्रमुख मागणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. बावनथडी धरण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचे संयुक्त धरण असून धरणाचा पाणीसाठ्यावर मध्यप्रदेश शासनाची देखरेख व नियंत्रण आहे.
सध्या जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु असल्याने प्रमुख समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे व जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी आरोप केला आहे.