२० कोटींची पाणीपुरवठा योजना अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 09:22 PM2019-04-30T21:22:07+5:302019-04-30T21:24:07+5:30

नगर पंचायत मोहाडीतर्फे शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने वीस कोटी रुपयांचा नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला, मात्र अजूनपर्यंत त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयात धूळखात पडला आहे,.....

Water supply scheme of 20 crores | २० कोटींची पाणीपुरवठा योजना अधांतरी

२० कोटींची पाणीपुरवठा योजना अधांतरी

Next
ठळक मुद्देमोहाडीतील प्रकार : नगर पंचायत पदाधिकाऱ्यांचा प्रशासकीय मान्यतेसाठी आटापिटा

सिराज शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : नगर पंचायत मोहाडीतर्फे शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने वीस कोटी रुपयांचा नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला, मात्र अजूनपर्यंत त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयात धूळखात पडला आहे, यासाठी नगराध्यक्षांसह काही नगरसेवक मंत्रालयात सुद्धा जाऊन आले पण त्यांना अजूनपर्यंत तरी यश प्राप्त झालेले नाही, यात जर या भागातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले तर मोहाडीकरांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येणार नाही.
मोहाडी शहराला कालबाह्य झालेल्या ४७ वर्षे जुन्या नळ योजने द्वारेच पाणीपुरवठा सुरू असल्याने गरजेपुरता सुद्धा पाणी मिळणे कठीण झाले आहे, दोन दिवसाआड नळाला पाणी येतो मात्र तोही पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नाही, शहरातील बहुतांश विहिरी सुद्धा कोरड्या पडल्या आहेत, त्यामुळे येथील जनतेला शहराबाहेरील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या धनदानंडग्या लोकांनी आपल्या घरी बोरवेल खोदल्यामुळे त्यांना पाण्याची टंचाई भासत नाही मात्र ६० टक्के सामान्य लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मोहाडीची पाणीपुरवठा योजना मोहगाव जवळील सूर नदीवर कार्यान्वित आहे. सूर नदी कोरडी पडली असल्याने तेथील पाणीपुरवठ्याच्या विहिरीला आवश्यक तेवढा पाणी उपलब्ध नाही. दोन बोअरवेलच्या माध्यमातून दोन दिवसाआड पाणी देणे शक्य झाले आहे. पुढील महिन्यात उन्हाची तीव्रता बघता चार ते पाच दिवसाआड पाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, तुमसर आणि भंडारा येथील नळ योजनेला शासनाने हिरवी झेंडी दाखविली. मात्र मोहाडी येथील योजना तशीच पडून आहे यावर जनतेनेच काय तो निर्णय घेणे अपेक्षित आहे
लावेसर येथे नवीन पाणीपुरवठा योजना
वीस कोटीची नवीन पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावानुसार नळ योजनेची मुख्य विहीर वैनगंगा नदी पात्रातील लावेसर येथे सनफ़्लैग कंपनीच्या नळ योजनेच्या बाजूला खोदण्यात येणार आहे, गोसीखुर्द धरणाचा बॅक वॉटर सतत लावेसर पर्यंत राहत असल्याने पाणी टंचाई भासणार नाही हा त्यामागील उद्देश आहे, या योजनेची जलवाहिनी लावेसर, कोथूरना, रोहना, दहेगाव मार्गे मोहाडीला आणण्यात येणार आहे, सदर योजनेत एक मुख्य टाकी (एम.डी.आर.) व तीन नवीन टाक़्या, तसेच जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात येणार आहे, शहरात नवीन जलवितरण वाहिन्या सुद्धा टाकण्यात येतील व नळाला मीटर सुद्धा बसविण्याचे प्रयोजन सदर प्रस्तावात आहे, लावेसर येथून शक्तिशाली मोटार पंपाद्वारे मोहाडी येथील मुख्य टाकीत पाणी सोडले जाईल व मुख्य टाकीतून इतर तीन टाक्यात पाण्याच्या दाबाने त्या टाक्या भरल्या जातील अशी नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यात येणार आहे,.
स्वखर्चाने बनविली बोअरवेल
शासनाकडून चालू नळ योजनेसाठी मदत मिळत नसल्याने व शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन खोडगाव पाणीपुरवठा योजनेवर नगरपंचायत उपाध्यक्ष सुनील गिरेपुंजे, नगरसेवक प्रदीप वाडीभस्मे, व गणेश निमजे यांनी मिळून स्वखर्चाने बोअरवेल खोदून त्यावर पंप बसविला ज्यामुळे सध्या दोन दिवसाआड पाणी देणे शक्य झाले आहे, तसेच नागरी सुविधा योजने अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मोहगाव पाणीपुरवठा योजनेवर एक बोअरवेल खोदण्यात आली मात्र एक वर्ष लोटूनही त्यावर पंप बसविण्यात आलेला नाही, यासाठी सा. बा. विभागाशी अनेक पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आले, पण पंप बसविन्यात आले नाही. अखेर उपाध्यक्ष सुनील गिरेपुंजे यांनी स्वत:च्या शेतातील सबमर्सिबल पंप आणून त्या बोअरवेल मधे तात्पुरत्या स्वरूपात लावून जनतेसाठी पाणी उपलब्ध करून दिले. या प्रयत्नामुळेच सुरनदी कोरडी पडल्यावर व विहिरीत पाणी नसताना सुद्धा दोन दिवसाआड पाणी देणे शक्य झाले.

नवीन पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता प्राप्त झालेली असून प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरनदी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे, सुरनदीवर जवळपास २० ते २५ पाणीपुरवठा योजना असल्याने पेंच चे पाणी सोडल्यास सर्वांना त्याचा लाभ होईल, तसेच नळ येण्याच्या वेळेवर वीज बंद करण्याची गरज आहे.
-सुनील गिरीपुंजे, न.प.उपाध्यक्ष

Web Title: Water supply scheme of 20 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी