चार काेटींची पाणीपुरवठा याेजना आठ वर्षांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:34 AM2021-01-20T04:34:47+5:302021-01-20T04:34:47+5:30
करडी परिसरातील करडी मुंढरी खुर्द, निलज खुर्द, निलज बुज, देव्हाडा बुज, नर्सिंगटाेला, माेहगाव, नवेगाव आदी गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ...
करडी परिसरातील करडी मुंढरी खुर्द, निलज खुर्द, निलज बुज, देव्हाडा बुज, नर्सिंगटाेला, माेहगाव, नवेगाव आदी गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने २००९ मध्ये पाणीपुरवठा याेजनेला मंजुरी दिली. सुमारे चार काेटी रुपये खर्च करून देव्हाडा साकाेली राज्य मार्गावर मानस साखर कारखान्याजवळ याेजना साकारण्यात आली. तीन किमी अंतरावरील वैनगंगा नदीवरील पंपहाउस, माेटारपंप, विहिरीचे बांधकाम, साठवण टाकी, जलशुद्धिकरण यंत्रणा गावात पाण्याची टाकी, पाइपलाइन आदींचा समावेश हाेता. सुरुवातीला आठ गावांचा समावेश असलेल्या या याेजनेतून करडी गावाने खर्चाचे कारण देत माघार घेतली. दरम्यान, २०११ मध्ये या याेजनेचे काम पूर्ण झाले. २०१२ मध्ये लाेकार्पण करण्यात आले.
याेजना सुरू हाेऊन काही कालावधी उलटत नाही, ताेच वीजबिल आणि देखरेखीचा माेठा बाेजा आला. जिल्हा परिषदेने मदत केल्याने पुन्हा ही याेजना कार्यान्वित झाली. कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी आंदाेलन पुकारले आणि याेजना बंद पडली ती कायमची. जेमतेम तीन ते चार महिने ही याेजना सुरू राहिली. चार काेटी रुपये खर्चाची ही याेजना आता भंगारात निघाली आहे.
बाॅक्स
याेजना सुरू करण्याचे प्रयत्न असफल
सात गावांच्या पाण्याचा प्रश्न असलेली ही याेजना सुरू करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याेजना सुरू करण्याचे आश्वासन दिले. तुमसर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन अधिकारी बावनकऱ्यांनी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले, परंतु उपयाेग झाला नाही. जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली हाेती. त्यावेळी माजी उपसभापती उपेश बांते यांच्या अध्यक्षतेत समिती गठन करून याेजना याेजना सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु ही याेजना अद्यापही सुरू झाली नाही.
काेट
याेजना सुरू करण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला. अनेकदा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. माेठ्या चार गावांचे नुकसान हाेत आहे. ठेकेदारांनी माेठ्या बजेटची याेजना राबविल्याची दिसून येत आहे.
- महादेव पचघरे
माजी सदस्य, पंचायत समिती माेहाडी