धानासाठी टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:30 PM2018-10-15T22:30:32+5:302018-10-15T22:30:53+5:30
शेतीच्या भरवशावर जीवन जगणारा शेतकऱ्यांच्या नशीबी गरीबीचेच जीवन आहे. मोठ्या आशेने शेतकरी धानाची पेरणी करतो व मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होईल या आशेने होतकरी प्रतिक्षेत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भुयार : शेतीच्या भरवशावर जीवन जगणारा शेतकऱ्यांच्या नशीबी गरीबीचेच जीवन आहे. मोठ्या आशेने शेतकरी धानाची पेरणी करतो व मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होईल या आशेने होतकरी प्रतिक्षेत होता. परंतु एका पावसाने आलेली धानाचे पीक हातचे जात असल्याने पवनी तालुक्यातील भुयार परिसरातील शेतकरी मात्र चिंताग्रस्त दिसून येत आहे. धानपिकाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
भुयार येथील गोपीचंद देशमुख याने आपल्या शेतात धानाचे पिक घेत असताना एका पाण्याची गरज भासली परंतु त्या शेताला लागून आजुबाजूला पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. अशा स्थितीत हातात आलेले धानाचे पिक जाईल या भीतीने गोपीचंद देशमुख याने महागडे पाणी टँकर बोलावून शेतात पाणी घातले आहे. पिकापेक्षा पाणी देण्यालाच जास्त पैसा लागेल या विवंचनेत शेतकरी सापडलेला आहे. या परिसरात टँकरने पाणी शेतात घालण्याची ही पहिलीच वेळ असावी, असे दिसून येते. यामुळे भुयार परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. शासनाने या परिसरात सर्वे करून दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी येथील नागरिक करताना दिसत आहेत.