किरमटीत टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:00 AM2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:53+5:30

गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली असताना जलकुंभातून गावकºयांना अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यावर गावातील काही नागरीक नळांना टिल्लू पंप लावून अतिरिक्त पाणी ओढून घेत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण करीत असल्याने गावातील अन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कृञीम टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Water supply by tanker in Kirmati | किरमटीत टँकरने पाणीपुरवठा

किरमटीत टँकरने पाणीपुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देकृत्रिम पाणी टंचाई । शेतशिवारातून आणले जातेय पिण्याचे पाणी, टिल्लू पंपही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यातील किरमटी येथे भारत निर्माण पाणीपुरवठा नळ योजनेअंतर्गत पिण्याच्या पुरवठा करणाऱ्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली आहे. तर दुसरीकडे काही नागरिक टिल्लू पंपांचा वापर करीत असल्याने पाण्याची कृत्रीम टंचाई निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नागरीकच टँकरने शेतशिवारातुन पिण्याचे पाणी गावात वितरीत करीत आहे.
जवळपास १२०० लोकसंख्या असलेल्या लाखांदूर तालुक्यातील किरमटी गावात मागील काही वर्षांपूर्वी लघु पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळ योजना कार्यान्वीत तरण्यात आली होती. सबंधित योजनेंतर्गत गावातील नळ योजनेला मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने पुढील काळात या गावात भारत निर्माण योजने अंतर्गत जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. सदर टाकीतील मागील अनेक वषार्पासुन नळ योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असला तरी या जलकुंभात जुण्याच नळ योजनेच्या विद्युत पंपाद्वारे पाण्याची साठवण केली जात आहे.
पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गावातीलच एका सार्वजनिक हातपंपावर बसविले असताना उन्हाळ्यात या हातपंपाची पाण्याची पातळी खालावली असल्याने पाण्याचा उपसाही कमी झालेला आहे. मागील काही वर्षापासून मोठे जलकुंभ असुनही गावकऱ्यांना पर्याप्त पिण्याचे पाणी ऊपलब्ध होत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.
गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली असताना जलकुंभातून गावकºयांना अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यावर गावातील काही नागरीक नळांना टिल्लू पंप लावून अतिरिक्त पाणी ओढून घेत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण करीत असल्याने गावातील अन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कृञीम टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांना शेतशिवारातुन टँकरद्वारे कृषीपंपाचे पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने गावात नव्याने एक बोअरवेल मंजुर केले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सबंधित बोअरवेलचे बांधकाम होऊ शकले नाही असेही सरपंचांनी सांगीतले. याप्रकरणी तात्काळ दखल घेऊन पाण्याची कृञीम टंचाई दुर करण्यासाठी मंजुर बोअरवेलचे बांधकाम तात्काळ सुरु करावे अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

तहान लागल्यावर...
पाण्याची कृत्रिम किंवा नैसर्गीक टंचाई निर्माण झाल्यावरच उपाययोजना राबविली जाते. किंबहूना तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार आहे. दरवर्षीच पाणीटंचाईला तोंड देत असताना नियमित व कायमस्वरूपी उपाययोजनेकडे लक्ष देण्यात विलंब होत असतो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.
टिल्लु पंपाद्वारे होणारी पाण्याची साठवण या गैरप्रकाराची माहिती येथील ग्रामपंचायत प्रशासनाला मिळाली. नळांना टिल्लू पंप लावून पाणी साठवण करणाऱ्या विरोधात कारवाई करताना गावातील काही नागरिकांनी टिल्लू पंप जप्त करण्यात आले.
- सुनिता मेश्राम, सरपंच, किरमटी

Web Title: Water supply by tanker in Kirmati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.