ठाणा येथील पाणीपुरवठा पाच दिवसांपासून ठप्प
By admin | Published: November 20, 2015 01:36 AM2015-11-20T01:36:55+5:302015-11-20T01:36:55+5:30
शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथील मुख्य व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्यामुळे गावातील
ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : पाण्यासाठी महिलांची भटकंती
जवाहरनगर : शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथील मुख्य व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्यामुळे गावातील शेकडो नळधारकांचा पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणी पुरवठाद्वारे आठ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यात ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंपचा समावेश आहे. बेला जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करण्यात येतो. पाण्याचा स्त्रोत ते ग्रामपंचायतच्या अखत्यारितील जलकुंभापर्यंतची देखभाल संबंधित यंत्रणेद्वारे करण्यात येते. तर जलकुंभापासुन गावात वितरीत करणाऱ्या जलवाहिनी देखभाल दुरुस्ती संबंधित ग्रामपंचायतीला करण्याचा करारनामा करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपाूसन आतापर्यंत पाच दिवसापासुन पाणीपुरवठा ठप्प आहे. याबाबत संबंधीत ग्रामपंचायतला विचारले असता जलकुंभाखालील मुख्य व्हॉब्ल्हमध्ये बिघाड आला आहे. परिणामी याचा फटका ठाणा येथील शेकडो नळजोडणीधारकांना बसला आहे.
यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या व्हॉल्व्हची दुरुस्ती केव्हा होणार याबाबत कुणीही उत्तरे देत नाहीत. याकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या ज्वलंत समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)