पाणी पुरवठ्याची कामे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:35 PM2018-03-24T23:35:24+5:302018-03-24T23:35:24+5:30

६७ कोटी ७९ लाख रुपयांची नवीन पाणी पुरवठ्याची योजना आणि दूषित पाण्याच्या निवारणासाठी तात्कालीन उपाययोजना म्हणून १० ठिकाणी आरो लावण्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करू, असे आश्वासन सर्वपक्षीय शिष्टमंडळात समोर नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी भाकपचे जिल्हासचिव व माजी नगर सेवक हिवराज उके यांना दिले.

Water supply works will be done | पाणी पुरवठ्याची कामे होणार

पाणी पुरवठ्याची कामे होणार

Next
ठळक मुद्देआंदोलन : नगराध्यक्षांचे आश्वासन

आॅनलाईन लोकमत
भंडारा : ६७ कोटी ७९ लाख रुपयांची नवीन पाणी पुरवठ्याची योजना आणि दूषित पाण्याच्या निवारणासाठी तात्कालीन उपाययोजना म्हणून १० ठिकाणी आरो लावण्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करू, असे आश्वासन सर्वपक्षीय शिष्टमंडळात समोर नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी भाकपचे जिल्हासचिव व माजी नगर सेवक हिवराज उके यांना दिले.
दूषित पाण्याचे निराकरण, शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना व इतर विषयांना घेवून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व माजी नगरसेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय पाणी पिलाओ सत्याग्रह आंदोलन २३ मार्चला राणा भवन भंडारा येथून मोर्चा काढून करण्यात आला व मोर्चा नगर परिषदेवर नेण्यात आला.
याप्रसंगी नगर परिषदेसमोर काँग्रेसचे धनराज साठवणे, भारिप बहुजन महासंघाचे चरणदास मेश्राम, डॉ. नितीन तुरस्कर, सदानंद इलमे, वामनराव चांदेवार, गजानन पाचे, हिवराज उके यांचे मार्गदर्शन झाले व पाणी प्रश्नासोबत विविध मागण्यांचे निवेदन देवून शिष्टमंडळाद्वारे नगराध्यक्षा सोबत चर्चा करण्यात आली.
त्यात दोन महिन्यात नवीन पाणी पुरवठ्याची योजना मंजुर करू, १० ठिकाणी आरो लावून शुद्ध पाणी देवू, नदी शुद्धीकरणासाठी एरिगेशन विभागाला स्मरणपत्र लिहू तसेच नागनदीच्या घाणपाण्यावर ६० टक्के शुद्धीकरणाचे काम सुरू आहे, आवास योजनेच्या डीपीआरचे काम सुरू असून ५०० घरांचे अप्रुअल मिळाल्यास काम सुरू करू, फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणी साठी समिती स्थापन केली असून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, छोटा बाजार शॉपिंग सेंटरचे पुननिर्माण लवकरच करण्यात येईल, भूमीगत गटार योजना व घनकचरा व्यवस्थापनाची डीपीआर तयार झाले आहे आणि पुढीलवर्षी १५ ते २० टक्के घरटॅक्समध्ये वाढ करू, असे आश्वासन दिले गेले. नगराध्यक्षासोबत अभियंता जामूणकर, उपाध्यक्ष आशु गोंडाने, माजी उपाध्यक्ष रूबी चढ्ढा होते.

Web Title: Water supply works will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.