जलयुक्त शिवाराने शेततळे, बंधारे तुडुंब भरलेच नाही

By admin | Published: August 4, 2016 12:31 AM2016-08-04T00:31:08+5:302016-08-04T00:31:08+5:30

करडी परिसरात पाऊस अत्यल्प झाला. शेतकऱ्यांनी कशीबशी ३० टक्के रोवणी आटोपली. ७० टक्के रोवणी पावसाअभावी रखडली आहेत.

Water tanks do not even fill the fields, bunds of water | जलयुक्त शिवाराने शेततळे, बंधारे तुडुंब भरलेच नाही

जलयुक्त शिवाराने शेततळे, बंधारे तुडुंब भरलेच नाही

Next

शेतकऱ्यांचा आरोप : उपविभागीय कृषी अधिकाऱ्याने केली पाहणी
करडी (पालोरा) : करडी परिसरात पाऊस अत्यल्प झाला. शेतकऱ्यांनी कशीबशी ३० टक्के रोवणी आटोपली. ७० टक्के रोवणी पावसाअभावी रखडली आहेत. नाले, शेततळे कोरडी तर काहींत अत्यल्प पाणी साठा असून दुष्काळाचे संकट आहे. असे असताना जलयुक्त शिवारामुळे करडी व अन्य गावातील शेततळे, बंधारे तुडंूब भरल्याचा गवगवा केल्याचा करडीतील शेतकऱ्यांचा आरोप आहे.
त्यानुसार २ आ़ॅगस्ट रोजी उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे यांनी पाहणी केली असता नाले, शेततळे कोरडी आढळली तर काहींत अत्यल्प साठा आढळून आला. मोहाडी तालुक्यातील करडी, नरसिंगटोला, बोरी, देव्हाडा बुज आदी गावात जलसंधारणाची कामे करण्यात आली. मागीलवर्षी आॅगस्ट महिन्यात तलाव, शेतबोळ्या, शेततळे, नाले तुडूंब भरून वाहत असताना यावर्षी अजूनही नाल्यांतून पाण्याची धार बाहेर पडलेली नाही. करडी परिसरातील सर्वात मोठा करडी मोहगाव नाला कोरडा पडला आहे. नागधोडीत कृषी विभागामार्फत खोलीकरण झालेले असताना त्यातही पाण्याचा साठा नाही. हीच अवस्था पालोरा, पांजरा, खडकी, जांभोरा, बोरगाव, ढिवरवाडा नाल्यांंची आहे. नाल्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. करडी गावातील भूपेंद्र साठवणे यांचा मुंढरी रस्त्याला लागून असलेला शेततळा कोरडा आहे. रोवणी झालेल्या शेतत भेगा पडल्या असून पीक पिवळे पडले आहे. करडीतील शेतकरी वर्गाची ही अवदशा असून परिसरातील ३० टक्के रोवण्या आटोपल्या आहेत. ज्यांच्याकडे सुविधा आहे. त्यांची रोवणी काही प्रमाणात आटोपली तर जे शेतकरी पावसावर अवलंबून आहेत. असे ७० टक्के शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जलयुक्त शिवाराने शेततळे, बंधारे तुडूंब भरल्याचे सांगण्यात आले. जिल्हा कृषी अधीक्षक नलिनी भोयर यांचेकडे आक्षेप नोंदविले. प्रत्यक्ष पाहणीची मागणीही केली होती. त्या प्रकरणी गंभीर दखल घेत उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे यांनी करडी परिसरातील अनेक गावातील नाले, शेततळे, नाला खोलीकरण, बंधारे यांची पाहणी केली असता सत्यता समोर आली. प्रत्यक्ष पाहणीवेळी मोहाडी मंडळ कृषी अधिकारी राहुल गायकवाड, कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार, कृषी सहाय्यक बारापात्रे, निखाडे व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Water tanks do not even fill the fields, bunds of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.