वैनगंगेत पाण्याचा ठणठणाट

By admin | Published: April 21, 2017 12:35 AM2017-04-21T00:35:36+5:302017-04-21T00:35:36+5:30

जीवनदायीनी बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा प्रवाह बंद पडला आहे. नदीपात्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या योजना येत्या काही दिवसात बंद पडण्याची शक्यता

Water tightening in Wainganga | वैनगंगेत पाण्याचा ठणठणाट

वैनगंगेत पाण्याचा ठणठणाट

Next

तुमसर तालुक्यात जलसंकट : बावनथडी तथा वाहनी बॅरेजमधून पाणी विसर्ग करण्याची गरज
मोहन भोयर  तुमसर
जीवनदायीनी बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा प्रवाह बंद पडला आहे. नदीपात्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या योजना येत्या काही दिवसात बंद पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वैनगंगेत पाण्याचा ठणठणाट असून नदीलाच येथे पाण्याची प्रतीक्षा आहे. शासन व प्रशासनाच्या नियोजनावरच पाणीबाणीची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.
तुमसर तालुक्यात वैनगंगेचा प्रवास सुमारे ३० ते ३५ कि.मी. इतका आहे. वैनगंगेचा सध्या प्रवाह बंद पडला आहे. नदीपात्रात अनेक गाव तथा तुमसर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. या सर्व पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहेत. केवळ १० ते १५ दिवस या योजनेतून पाणीपुरवठा शक्य असल्याची शक्यता आहे. प्रवाहच बंद पडल्याने पाणी येणार कुठून असा प्रश्न आहे. वाहणी / मांडवी येथे बॅरेज तयार झाल्याने पाणी अडवून ठेवले जाते. पुढचा प्रवास वैनगंगेचा खडतर बनला आहे. केवळ बॅरेजच्या खालून नळासारखे पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. बॅरेजनंतर वैनगंगा नदीपात्र कोरडे पडले आहे.
सध्या नदीपात्रात ठिकठिकाणी तलावासारखे खड्डे पडले आहेत. त्या खड्यात केवळ अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा मृत साठा मानला जातो. जीवनदायीनी वैनगंगेलाच येथे पाण्याची गरज आहे. नदी, तलाव, बोड्या इत्यादी जलस्त्रोत येथे शेवटची घटका मोजत आहेत. बावनथडी नदीवर धरण बांधण्यात आल्याने धरणापलीकडे बावनथडी नदी कोरडी पडली आहे. तुमसर तालुक्यातील सुमारे २५ ते ३०गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बावनथडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी सर्वपक्षीय नेते करीत आहेत.
आ.चरण वाघमारे यांनी बावनथडी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. कटंगीचे आमदार के.डी. देशमुख यांची भेट घेऊन बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्यासंदर्भात दोन्ही आमदारांची चर्चा दोन दिवसापूर्वी झाल. पाणी विसर्ग करण्याबाबत येथे संघर्षाची शक्यता आहे. वाहणी / मांडवी बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाणी विसर्ग करण्याची येथे गरज आहे.

Web Title: Water tightening in Wainganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.