८०० हेक्टर शेतीला मिळणार पाणी

By admin | Published: November 17, 2016 12:40 AM2016-11-17T00:40:49+5:302016-11-17T00:40:49+5:30

चांदपूर जलाशय अंतर्गत पाणी वाटपाचे पाणी पट्टी कराचे १७५ लाख रूपयांची थकबाकी शेतकऱ्याकडे असताना उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नाही, ...

Water will get 800 hectares of farm land | ८०० हेक्टर शेतीला मिळणार पाणी

८०० हेक्टर शेतीला मिळणार पाणी

Next

नव्याने तीन गावांचा समावेश : करारनामे शेतकरी करणार, थकबाकीनंतरही दिलासा
चुल्हाड (सिहोरा) : चांदपूर जलाशय अंतर्गत पाणी वाटपाचे पाणी पट्टी कराचे १७५ लाख रूपयांची थकबाकी शेतकऱ्याकडे असताना उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नाही, अशी परिसरात चर्चा सुरू असताना यंदा डावा कालवा अंतर्गत ८०० हेक्टर आर शेतीला उन्हाळी धान पिकाला पाणी वाटप करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने बैठकीत घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिहोरा परिसरात मध्यम प्रकल्प चांदूपर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी लघु पाटबंधारे विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या देखरेख खाली दोन पाणी वापर संस्था कार्यरत आहे. या पाणी वापर संस्थेकडे पाणी पट्टी कराची जुनी थकबाकी आहे. लघु पाटबंधारे विभागाचे शेतकऱ्यांकडे पाणीपट्टी कराचे १७५ लाख रूपयांची थकबाकी शिल्लक आहे. ही थकबाकी वसुलीकरिता जुन्या नोटा स्विकारण्यासाठी उपक्रम सुरू केला असताना शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. साधे थकबाकीचे १७५ रूपये पाटबंधारे विभागाच्या तिजोरीत जमा झाले नाही. थकबाकीचा फुगणारा आकडा चिंतेचा असणारा आहे. याशिवाय चांदपूर जलाशयाला तारणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाकडे ६० लाख रूपये विजेची थकबाकी असल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
यामुळे पाणीपट्टी करांच्या वसुली करिता पाटबंधारे विभागाची यंत्रणा शेतकऱ्यात जनजागृती करित आहे. या विभागात मजुराच्या खांद्यावर प्रशासकीय कारभाराचा डोलारा सुरू आहे. निम्याहून अधिक महत्वपूर्ण पदे रिक्त आहेत. लिपिक, शाखा अभियंता या पदाचा ठणठणाट आहे. १४ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्याची जबाबदारी प्रभारी शाखा अभियंताच्या मानगुटीवर देण्यात आली आहे. त्यामुळे विकास कामे प्रभावित झाली आहे.
जबाबदार नियमित कर्मचारी कार्यरत नसल्याने मजुर गटात येणारे कार्यरत कर्मचारी कानावर हात ठेवत आहेत. या विभागात मनुष्य बळाचा अभाव असल्याने मजुर पाणी वाटपाची जबाबदारी स्विकारत नाहीत. उन्हाळी धान पिकांना अधिक पाण्याची गरज लागत असल्याने यंदा चांदपूर जलाशयात असणारे शिल्लक २२ फुट पाणी शेतकऱ्यांना मिळणार किंवा नाही अशी चर्चा सुरू झाल्या असताना पाठबंधारे विभागाने रोटेशन पद्धतीने पाणी वाटपाचा निर्णय घेतला आहे. रोटेशन पद्धतीनुसार यंदा डावा कालवा असल्याने ३५० हेक्टर आर शेतीची निवड बैठकीत करण्यात आली. ही चुल्हाड गावच्या हद्दीतील आहे. (वार्ताहर)

ग्रामपंचायतमध्ये अल्प प्रतिसाद
पाठबंधारे विभागात रिक्त पदे असल्याने थकबाकी वसुली करिता ग्राम पंचायतीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वत:हून शेतकरी थकबाकीची राशी कार्यालयात येवून जमा करित नाहीत. यामुळे पर्याय शोधण्यात आला असता शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिला आहे. यामुळे थकबाकीचा वाढता आकडा आहे. थकबाकी देयकासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
रिक्त पदाचा अनुशेष भरा
पाटबंधारे विभागात रिक्त पदाचा अनुशेष टेंशन वाढविणारा आहे. ही पदे तात्काळ भरली पाहिजे. यामुळे पाणीपट्टी कराची वसुली प्रभावित होणार नाही, अशी माहिती आहे.

पाठबंधारे विभागातील रिक्त पदे, कालवा व नहराचे सिमेंट अस्तरिकरण झाले पाहिजे. शेतकऱ्यांचे हितासाठी या विभागाला सक्षम केले पाहिजे.
-राजेंद्र ढबाले,
सदस्य पं.स. चुल्हाड.

Web Title: Water will get 800 hectares of farm land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.