काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन

By admin | Published: April 12, 2016 12:35 AM2016-04-12T00:35:16+5:302016-04-12T00:35:16+5:30

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर गोंदिया येथे आयोजित पत्रपरिषद दरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला.

The way of Congress Roko agitation | काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन

काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन

Next

आरोपींना अटक करा : गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
भंडारा : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर गोंदिया येथे आयोजित पत्रपरिषद दरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, सोमवारला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तत्पुर्वी त्रिमूर्ती चौक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध म्हणून जिल्हाध्यक्ष जिया पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिरलोरकर, मधुकर लिचडे, आशिष पात्रे, प्रेमसागर गणवीर, प्रसन्न चकोले, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, अजय गडकरी, शिशिर वंजारी यांच्या संयुक्त नेतृत्वात निदर्शने करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम केल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती. दरम्यान राज्यशासनाच्या लोकशाही विरोधी कृत्याच्या विरोधात आंदोलनकर्ते घोषणा देत होते.
घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून शिव शर्मा याचा स्विकृत सदस्यपद रद्द करावा, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी जि.प. सदस्य प्रेमदास वनवे, निलकंठ (बालु) कायते, प्यारेलाल वाघमारे, चुन्नीलाल वासनिक, रेखा वासनिक, सुरेश गोन्नाडे, विनीत देशपांडे, इमरान पटेल, यशपाल कामठे, चैनलाल मस्के, अशोक बन्सोड, रोहित धकाते, भुपेंद्र इलमे, चेतन सेलोकर, नारायण मेश्राम, अयुब पटेल, सिताराम कापगते, विवेक भोयर, राजकपूर सरादे, अजय तांबे, रोहित दुर्गे, प्रदीप डोंगरे, श्रीराम अटराये, अमित उके, सुशील नगराळे, अजय तांबे, रूपलता जांभुळकर, गोविंद मेघराजानी, मोहन उके, मनोज टहिल्यानी, प्रदीप तितीरमारे, माधवराव भोयर, हमीम अकबानी, नरेश बेलेकर, भारती लिमजे, भावना शेंडे, कविता चाचेरे, चांगुणा करवाडे, ममता करवाडे, रत्नमाला मेश्राम, उपासना शेंडे, इंदू गणवीर, सुनिता खंडाते, सुनिता रोकडे, देवका मेश्राम, अनुसया नेवारे, अनिल निर्वाण, सुरेश निर्वाण, मुकूंद साखरकर, वरगंटीवार, सचिन फाले, बोरकर यांच्यासह शेकडो व कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

तुमसरात काँग्रेसचा निषेध मोर्चा
तुमसर : लोकलेखा समिती अध्यक्ष तथा काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक यांना तात्काळ अटक करण्याकरिता तुमसरात सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मारहान प्रकरणी काँगे्रसने निषेध व्यक्त करून तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
तुमसर-मोहाडी विधानसभा युवक काँग्रेस, तुमसर शहर काँग्रेस कमेटी, महिला काँग्रेस शहर व तालुका ओबीसी सेल, अल्पसंख्यांक सेल, सामाजिक न्याय मंच सेल, सफाई कामगार सेल, एनएसयुआय या संघटनांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांचेवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करून भाजप नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
राज्यात भारतीय जनता पक्षाचे सहकार केंद्र व राज्यात आले तेव्हापासून सर्वसामान्य जनता व विरोधी पक्षाचे जनप्रतिनिधीवर हल्ले होत आहेत. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सत्तेचे दुरूपयोग करीत आहेत. यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे.
तत्पूर्वी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते शहराच्या मुख्य मार्गानी भाजप सरकारच्या निषेध असो अशी घोषनेबाजी करीत तहसील कार्यालयात गेले.
मोर्च्यात तुमसर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमरनाथ रगडे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सीमा भुरे, नगरसेवक प्रमोद तितीरमारे, शहर अध्यक्ष प्रकाश शहारे, राजेश चोपकर, मनोहर सिंगनजुडे, अस्मिता वाघमारे, तुमसर-मोहाडी विधानसभा युवक अध्यक्ष नीरज गौर, विजय गिरीपुंजे, राजू पाटील, योगिता बावनकर, नारायणराव तितीरमारे, गळीराम बांडेबुचे, वैशाली भवसागर, नगरसेविका लक्ष्मी कहालकर, सविता ठाकूर, नलिनी डिंकवार, उषा बिसेन, प्रफुल्ल बिसेन, अजय गौरकर, गुडविच फेड्रीक, भास्कर सार्वे, कान्हा बावनकर, सुमित चौधरी, संगम पिकलमुंडे, मुकुंद डोंगरे, पवन भोरगडे, जयंत गणेशे, शैलेश पडोळे, बाळा ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, प्रभू सरकार, शुभम गजभिये, मोहीत मेश्राम, आनंद बिसनेसह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The way of Congress Roko agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.