वृक्षतोडीने जंगल ओसाड होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:54 PM2018-05-11T22:54:47+5:302018-05-11T22:54:47+5:30

नैसर्गिक संपदेने नटलेले पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलाचे अस्तीत्व आहे. कधी काळी घनदाट असलेल्या जंगलातून जाताना भिती वाटायची परंतु अलीकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल ओसाड असल्याचे चित्र आहे.

On the way to the desert becoming a desert | वृक्षतोडीने जंगल ओसाड होण्याच्या मार्गावर

वृक्षतोडीने जंगल ओसाड होण्याच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देपर्यावरण प्रेमींचेही दुर्लक्ष : योजनाबद्ध पद्धतीने तस्करांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
पालोरा : नैसर्गिक संपदेने नटलेले पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलाचे अस्तीत्व आहे. कधी काळी घनदाट असलेल्या जंगलातून जाताना भिती वाटायची परंतु अलीकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल ओसाड असल्याचे चित्र आहे. अशिच परिस्थिती राहिल्यास भविष्यात पवनी तालुक्यातील जंगलाचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.
पवनी तालुक्यात वाही, सिंगोरी, भुयार, पाहूणगाव, खापरी, कोरंभी अशा भागात घनदाट जंगल होती. सध्याच्या स्थितीमध्ये ही जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पवन राजाच्या पहाडीच्या किल्ल्यावरुन बघीतले तर चोहीकडे हिरवेगाव जंगल पाहायला मिळत होते. वाढती लोकसंख्या वाढते शहर, वाढते औद्योगिक कारखाने यामुळे जंगल नामशेष होत आहेत. यामुळे या भागात पाणी अल्पप्रमाणात पडते व उष्णता ताप वाढत आहे. जंगलाचे रक्षकच भक्षक बनले आहेत. जंगलाचे रक्षण करणारे अधिकारी व कर्मचारी याकडे कानाडोळा करीत आहेत. दिवसाढवळ्या काही कंत्राटदार जंगलाच्या मध्यभागी जावून मशीनद्वारे सागवन जातीचे वृक्षतोड करीत आहेत. हे चित्र गावकऱ्यांना दिसते मात्र वनविभागातील कर्मचाºयांना का दिसत नाही. असा प्रश्न पडत आहे. संगनमताने हा सर्व प्रकार सुरु असल्याचे काही ग्रामस्थ सांगत आहे.
स्थानिकांना हाताशी धरुन तस्कर जंगलात शिरत आहेत. सागवन व आडजात वृक्षाची खुलेआम कततल करीत आहेत. या वृक्षतोडीमुळे पवनी तालुक्यातील पर्जन्यमानात घट होत आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास निसर्गाचा हा अनमोल ठेवा नष्ठ होण्याची भिती आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पवनी तालुकयात उष्णतेचा लाटेमुळे होरपळून निघत आहे. दरवर्षी पवनीच्या तापमानात वाढ होत आहे. याला जिम्मेदार वनराई कमी होत असल्याचे परिणाम आहेत. तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. वन वृक्षाचे लागवड करणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या करिता कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केला जात आहे. मात्र हे सर्व कागदावरच पाहायला मिळत आहेत.
वृक्षाची जतन करण्यासाठी शासनाने काही नियम केले आहेत. ईतकेच नव्हे तर या नियमाची अंमलबजावणी योग्य तºहेने व्हावे म्हणून वनविभागाची निर्मिती केली. परंतु वनविभागाच्या कर्मचाºयांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीवच दिसत नाही. पवनी तालुक्यात वृक्षाची कत्तल अतिशय योजनाबध्द पध्दतीने सुरु आहे. या परिसरात मोजक्याच आरामशीन आहेत. तेथे फक्त दाखविण्यासाठी परवानगीचे काही लाकडे कटाईसाठी दाखविले जातात. तर चोरीचे लाकडे रात्रीला कापले जातात.

Web Title: On the way to the desert becoming a desert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.