आम्ही भृूमिकेवर ठाम, विचारांशी कदापि तडजोड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:25 PM2018-10-17T21:25:30+5:302018-10-17T21:25:53+5:30

शिक्षणामुळेच प्रगती शक्य आहे. शिक्षणाचे महत्व मोठे असून शिक्षणच मानवाचे रक्षण करते. यापुढे माओवाद, नक्षलवाद चालणार नाही तर केवळ आंबेडकर वाद झालेल. आंबेडकरी चळवळ पुढे घेवून जाण्याची गरज आहे. आम्ही आपल्या भुमिकेवर ठाम असून विचारांशी आम्ही कदापी तडजोड करीत नाही, असे रोकठोक प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केले.

We strongly believe in Bhoomi, never mindset the ideas | आम्ही भृूमिकेवर ठाम, विचारांशी कदापि तडजोड नाही

आम्ही भृूमिकेवर ठाम, विचारांशी कदापि तडजोड नाही

googlenewsNext
ठळक मुद्देरामदास आठवले : तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शिक्षणामुळेच प्रगती शक्य आहे. शिक्षणाचे महत्व मोठे असून शिक्षणच मानवाचे रक्षण करते. यापुढे माओवाद, नक्षलवाद चालणार नाही तर केवळ आंबेडकर वाद झालेल. आंबेडकरी चळवळ पुढे घेवून जाण्याची गरज आहे. आम्ही आपल्या भुमिकेवर ठाम असून विचारांशी आम्ही कदापी तडजोड करीत नाही, असे रोकठोक प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केले.
इंदुताई शिक्षण संस्थेच्या वतीने तुमसर येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ. सच्चिदानंद फुलेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मधुकर कुकडे, आमदार परिणय फुके, माजी कुलसचिव पुरण मेश्राम, राजन वाघमारे, माजी कुलगुरु सुधिर मेश्राम, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष भुपेंद्र थुलकर, डॉ. मधुसुदन फुलेकर, डॉ. एन. एम. खिराडे, डॉ. अनिल हिरेखन, प्रभाकर दुपारे, डॉ. विनोद भोयर, भदंत राहुल बोधी, माजी नगराध्यक्ष गिता कोंडेवार उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, अ‍ॅट्रॉसिटी रद्द करणे, आरक्षण रद्द करणे इत्यादी विरोधात आमची ठोस भूमिका मत्रिमंडळात मांडली. गोरगरीब दलितांचे प्रश्न सोडविताना तडजोड केली जात नाही. आम्हाला देशात आंबेडकरी चळवळ उभी करायची आहे. शांततामय बुद्धाच्या मार्गाने जावे लागे, भीमाने इतिहास बदलविलेला, आम्हाला जयभीमचा नारा हवा, शाळा, महाविद्यालयात मानवतेचे शिक्षण देण्यावर भर दिला. असे सांगत पुन्हा देशात एनडीएचे सरकार येईल असे सांगितले. यावेळी नामदार आठवले यांनी कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी नामदार आठवले यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण व तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले.
आमदार परिणय फुके व खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. सच्चिदानंद फुलेकर यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक बिसेन यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक विद्याताई फुलेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: We strongly believe in Bhoomi, never mindset the ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.