विवाह सोहळा समाजाला एकत्रित आणते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:26 PM2018-04-29T22:26:41+5:302018-04-29T22:26:41+5:30

मागील काही वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्या मुला-मुलींचे लग्न करणे मुलींच्या वडीलांना फार कठीण जाते. या महागाईच्या काळात सर्वसामान्य लोकांना कर्जबाजारी व्हावे लागते.

Wedding celebrations bring together the community | विवाह सोहळा समाजाला एकत्रित आणते

विवाह सोहळा समाजाला एकत्रित आणते

Next
ठळक मुद्देनाना पटोले : आदिवासी हलबा हलबी समाजाचा विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : मागील काही वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्या मुला-मुलींचे लग्न करणे मुलींच्या वडीलांना फार कठीण जाते. या महागाईच्या काळात सर्वसामान्य लोकांना कर्जबाजारी व्हावे लागते. कमी खर्चात व अल्पवेळात सामुहिक विवाह सोहळा आदर्श समाज घडवून आणतो. सामुहिक विवाह सोहळा समाज एकत्र आणण्याचे काम करतो, असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी व्यक्त केले.
गोरेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे आयोजित आदिवासी हलबा/हलबी सामूहिक विवाह सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. आदिवासी संघटनेचे डॉ. नामदेवराव किरसान व त्यांच्या समितीच्या आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यात २० जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी आदिलोक युवा मंचतर्फे भारतीय संविधान या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या समाजात सेवा करण्याचे काम व लोकांना शुद्ध पाणी मिळावा व त्यांचे आरोग्य चांगले राहावे व अपेक्षेच्या दृष्टीने पाणी देण्याचे काम प्रभारी मंडळ कृषी अधिकारी मालिकचंद मेळे यांनी केले.
या कार्यक्रमाला आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. रामरतन राऊत, माजी आ. खुशाल बोपचे, माजी आ. दिलीप बन्सोड, माजी आ. हेमंत पटले, केंद्रीय अध्यक्ष श्रावण राणा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. के.आर. शेंडे, उषा मेंढे, शिवलाल गावड, विजय राणे, अमर वºहाडे, किसन मानकर, ओ.एस. जमदाळ, जिल्हा परिषद सदस्य भोजराज चुलपार,मनोहर चंद्रिकापुरे, गोरेगावच्या नगराध्यक्ष सीमा कटरे, न.प.उपाध्यक्ष आशिष बारेवार, विरेंद्र जायस्वाल, जगदीश येरोला, सभापती मलेशाम येरोला, जे.टी. दिहारी, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, देवराज वडगाये, हिरालाल फाफनवाडे, पं.स. सदस्य केवल बघेले, पी.पी. कोरोंडे, यु.जी. फरदे, एस.आर. चनाप, माजी तहसीलदार खुशाल खुटमुडे, उपमुख्याधिकारी सी.ए. राणे, एन.एम. किरसान, हौसलाल रहांगडाले, सी.आर. भंडारी, एम.बी. दमाहे, तुलाराम मारगाये, रामू औरासे, महेंद्र दिहारे, विनोद उके, मधुकर किरसान उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. नामदेवराव किरसान, रामचंद्र फरदे, अजय कोटेवार, एच.बी. राऊत, वाय.सी. भोवर, मुलचंद खांडवाये, एस.सी. भोयर, विरेंद्र चाकाटे, सूरज कोल्हारे, प्रभूदयाल मसे, विजय कोटेवार, बी.एस. वडेगावकर, सुभाष चुलपार, टी.एम. बिसेन, कारु फरदे, भरत घासले आदींनी सहकार्य केले.

Web Title: Wedding celebrations bring together the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.