विकेंड लाॅकडाऊन कडकडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 05:00 AM2021-04-11T05:00:00+5:302021-04-11T05:00:41+5:30

पाेलिसांनी भंडारा शहरात राजीव गांधी चाैक, खांबतलाव, नगरपरिषद, त्रिमूर्ती चाैक, बसस्थानक, लालबहादूर शास्त्री चाैक बॅरिकेट्स लावून नाकाबंदी केली हाेती. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची चाैकशी केली जात हाेती. महत्त्वाचे काम असले तरच जाऊ दिले जात हाेते, अन्यथा तंबी देऊन घरी पाठविले जात हाेते. अनेक चाैकात पाेलीस तैनात करण्यात आले हाेते. ग्रामीण भागातही या लाॅकडाऊनला जनतेचा चांगलाच प्रतिसात मिळाला. करडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

Weekend lockdown tight | विकेंड लाॅकडाऊन कडकडीत

विकेंड लाॅकडाऊन कडकडीत

Next
ठळक मुद्देरस्त्यावर तुरळक गर्दी : पाेलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी जिल्ह्यात कठाेर निर्बंध लावले जात असून, त्याअंतर्गत शुक्रवार रात्रीपासून वीकेंड लाॅकडाऊन करण्यात आला आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांसह नागरिकांनीही या लाॅकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाेलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून प्रत्येकाची चाैकशी सुरू केली हाेती. त्यामुळे भंडारा शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसत हाेते. एसटी बस सुरू असल्याने बसस्थानक परिसरात तुरळक गर्दी दिसत हाेती. कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडत नसल्याचे चित्र दिवसभर हाेते. 
भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. दरराेज हजारावर काेराेनाबाधित आढळून येत आहे, तर मृतांची संख्याही वाढत आहे. काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध घालून दिले आहेत. त्याअंतर्गत शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून जिल्ह्यात वीकेंड लाॅकडाऊन घाेषित करण्यात आला. शनिवारी सकाळी रस्त्यावर काही ठिकाणी नागरिकांची वर्दळ दिसत हाेती. पाेलिसांनी शहरभर गस्त घालून नागरिकांना सूचना दिल्या. त्यामुळे टपऱ्या व काही किराणा दुकाने बंद करण्यात आली. 
पाेलिसांनी भंडारा शहरात राजीव गांधी चाैक, खांबतलाव, नगरपरिषद, त्रिमूर्ती चाैक, बसस्थानक, लालबहादूर शास्त्री चाैक बॅरिकेट्स लावून नाकाबंदी केली हाेती. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची चाैकशी केली जात हाेती. महत्त्वाचे काम असले तरच जाऊ दिले जात हाेते, अन्यथा तंबी देऊन घरी पाठविले जात हाेते. अनेक चाैकात पाेलीस तैनात करण्यात आले हाेते. ग्रामीण भागातही या लाॅकडाऊनला जनतेचा चांगलाच प्रतिसात मिळाला. करडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
वीकेंड लाॅकडाऊन असला तरी एसटी बस मात्र सुरू हाेती. त्यामुळे बसस्थानकावर काहीअंशी प्रवाशांची गर्दी दिसत हाेती. नियमित असणारे एसटीचे शेडूल शनिवारी कमी करण्यात आले हाेते. भंडारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी लाॅकडाऊनला प्रतिसाद मिळाला. साकाेली पवनी, लाखनी, लाखांदूर, माेहाडी, तुमसर येथेही व्यापारी आणि नागरिकांनी बंद पाडून प्रशासनाला सहकार्य केले. 

राष्ट्रीय महामार्गावर पाेलिसांची करडी नजर
 भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दिवसभर पाेलिसांची करडी नजर हाेती. भंडारा लगतच्या धारगाव येथे पाेलिसांनी दुचाकीस्वारांना थांबवून त्यांची चाैकशी सुरू केली हाेती. येणाऱ्या प्रत्येकाला तंबीही दिली जात हाेती. पाेलीस केवळ दुचाकी चालकांचीच चाैकशी करीत असल्याचे दिसत हाेते. 
सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
शनिवारी पहिल्या दिवशी वीकेंड लाॅकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा लाॅकडाऊन दाेन दिवसांचा असून, रविवारीसुद्धा नागरिकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले. नगरपरिषदेचे पथक शहरभर गस्त घालून नागरिकांना सूचना देत हाेते.

 

Web Title: Weekend lockdown tight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.