आठवडी बाजाराचा लिलाव झाला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:35 AM2021-03-20T04:35:14+5:302021-03-20T04:35:14+5:30

मोहाडी : आपण घातलेली रक्कम बुडणार तर नाही ना, या भीतीने ठेकेदारांनी हात आखडते घेतले. त्यामुळे मोहाडीतील गुरुवार बाजाराचा ...

Weekly market auction canceled | आठवडी बाजाराचा लिलाव झाला रद्द

आठवडी बाजाराचा लिलाव झाला रद्द

Next

मोहाडी : आपण घातलेली रक्कम बुडणार तर नाही ना, या भीतीने ठेकेदारांनी हात आखडते घेतले. त्यामुळे मोहाडीतील गुरुवार बाजाराचा दुसऱ्यांदा होणारा लिलाव अखेर रद्द करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने रद्द झालेला लिलाव, नगरपंचायतने दुसऱ्यांदा केला. जामा मस्जिद कमिटीचे सचिव नईम कुरेशी यांनी हा अन्याय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.

मुख्याधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची शहानिशा केली गेली नाही. १० मार्चचा रद्द झालेला लिलाव १८ तारखेला होईल, असे घोषित केले. कागदोपत्री पी-१ (१९१६-१७) नुसार सध्या गट नंबर ९१ व ४६ ज्यावर बाजार भरविल्या जाते ती जागा खाजगी स्वरूपाची आहे. कब्रस्तान व ईदगाहकरिता मुकरर्र आहे. निस्तार पत्रकानुसार भोगवटदार मुस्लिम समाज आहे. १९८६ ला झालेल्या फेरफारमध्ये भोगवटदार ठिकाणी सरकार (लहान झाडांचे जंगल) अशी चुकीची नोंद घेण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. त्याऐवजी भोगवटदार ठिकाणी जामा मस्जिद कमिटी, मोहाडी अशी नोंद घेणे गरजेचे होते. तत्कालीन स्थानीय प्रशासनाने तत्कालीन अधिकाऱ्यांशी संगनमत करून लाभासाठी मुस्लिम समाजाचा हक्क हिरावून नोंद केली. तत्कालीन समयी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची चूक केल्याचे लिहून स्पष्ट केले आहे. सर्व प्रकारच्या वक्फ संपत्तीच्या कागदपत्रांची दुरुस्ती करून भोगवटदार ठिकाणी जामा मस्जिद कमिटी मोहाडी व इतर अधिकारमध्ये वक्फ सत्ता प्रकार अशी नोंद घेण्यात यावी, असे आदेशच दिले आहे. पर्यायी जागा न शोधता शासन आदेशाची अवहेलना करीत १८ तारखेला लिलाव करण्यात आला. लिलावाकरिता कंत्राटदाराऐवजी दुकानदार, भाजीपाला दुकानदार, व्यापारी, गावाची सामान्य जनता तसेच राजकीय कार्यकर्ते यांना १८ तारखेच्या लिलावावेळी उपस्थित राहण्याकरता काहींतर्फे व्हॉट्सॲपद्वारे आवाहन करण्यात आले. लिलाव प्रक्रिया सुरू झाली असता नगरपंचायतकडून गट नं. ९१ कब्रस्तानवरील आठवडी बाजाराकरिता ठरविण्यात आलेली रक्कम, जागेवर स्थगिती आल्यास आपले माठे नुकसान होईल. तसेच ४६ इदगाह गटावर बाजाराची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे जामा मस्जिद कमिटी मोहाडीने ती जागा आपल्या कब्ज्यात घेतली असता बाजाराचे स्वरूप अर्धे होईल. या धास्तीपोटी एकाही कंत्राटदाराने बोली बोलली नाही. नगरपंचायतला दुसऱ्यांदा करण्यात आलेला लिलावही रद्द करण्यात आला. ही जागा मुस्लिम समाजाचीच आहे व शासननिर्णय असल्याने आज ना उद्या फेरफार होणारच, अन्यायाला पण वय असते, शासननिर्णयामुळे अन्याय संपुष्टात आला आहे, अशी जनसामान्यात चर्चा आहे. नगरपंचायत बाजाराचे नियोजन काही लोकांच्या फायद्यासाठी मुद्दा कायम ठेवून वापर करते किंवा आपल्या हक्काची जागा शोधून या मुद्याला कायमचे संपुष्टात आणते याकडे सर्व जनतेचे लक्ष आहे.

" वादविवादाच्या गुरफट्यात न पडता कागदोपत्री कार्यवाही करून समाजाच्या उत्थानासाठी नगरपंचायतीकडून होत असलेला अन्याय संपुष्टात आणण्याचा माझा आटोकाट प्रयत्न राहील. दुसऱ्याच्या हक्कावर डल्ला न मारता नगरपंचायतने आपल्या हक्काची जागा शोधून बाजार भरवावा व सामाजिक सलोखा वाढेल व गावाची प्रगती होईल याकडे लक्ष केंद्रित करावे.

नईम कुरेशी, सचिव-जामा मस्जिद कमिटी, मोहाडी

Web Title: Weekly market auction canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.