महामार्गावरील आठवडी बाजार धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:51 PM2018-06-02T21:51:10+5:302018-06-02T21:51:19+5:30
तालुक्यातील लाखनी शहराचा आठवडी बाजार मंगळवारला भरत असतो. लक्षावधी रूपयांची उलाढाल असणारा लाखनीचा आठवडी बाजार सोमलवाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बाजार जागेत भरायचा.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील लाखनी शहराचा आठवडी बाजार मंगळवारला भरत असतो. लक्षावधी रूपयांची उलाढाल असणारा लाखनीचा आठवडी बाजार सोमलवाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बाजार जागेत भरायचा.
बाजाराची वाढती व्याप्ती व जनतेच्या सुविधा व सोयीसाठी काही किरकोळ विक्रेत्यांनी भाजीबाजार राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर आणला आहे. तहसिल कार्यालय परिसर पासून ते शिवाजी चौकापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर बाजार एका बाजुला विस्तारलेला आहे. भाजीबाजारामुळे लाखनी शहरातील सर्व्हिस मार्गावर प्रचंड गर्दी असते. लोकांची वाहने राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य रस्त्यावर ठेवलेली असतात.
लाखनी शहरात अनियंत्रीत ट्रकमुळे पाच व्यक्तींचा बळी गेला तर अनेक वाहनाचा चुराडा झाला. अशाप्रकारची घटना लाखनी शहरात केव्हाही घडू शकते. अनियंत्रित ट्रक व अवजड वाहने बाजारात घुसली तर अनेक लोकांचे हकनाक प्राण जातील. अपघाताच्या व गंभीर दुखापतीच्या घटना घडू शकतात.
या टाळण्यासाठी अशोका बिल्डकॉन व कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे प्रयत्न करण्यात आले होते. भाजीबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यॉर्डात स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आठवड्यातून दोनदा भाजीबाजार भरविण्याचा प्रयत्न बाजार समितीकडून करण्यात आला. त्यालाही यश मिळाले नाही.
भाजीविक्रेतेने राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरून बाजार हटविण्यास विरोध करतात. अशोक बिल्डकॉन व पोलीस विभागाने राष्ट्रीय महामार्गावरील बाजार हलविण्याचा प्रयत्न केला. जुनी बाजाराची जागा ओस पडत आहेत.
एकाच कुटुंबातील भाजीव्रिकेते दोन दोन ठिकाणी दुकाने लावतात. भाजीविक्रेत्यांना जनतेच्या जीवाची कोणतीही काळजी नाही. आठवडी बाजार मंगळवारला मोठी दुर्घटना घडू शकते ते टाळण्यासाठी सर्व्हिस रोडवरील बाजार हलविणे महत्वाचे आहे.
सोमलवाडा मार्गावर जुन्या गुरांच्या बाजारात जागा आहे. मुख्य बाजाराची जागा ओस पडून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडचा बाजार वाढला आहे.
गर्दीचा फायदा चोरटे घेतानी दिसून येतात. मोबाईल व दागिने चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरक्षित बाजाराचे स्थळ ही जनतेची गरज बनली आहे. अनेक गैरसोय असलेला बाजार लाखनी शहराचा आहे तसेच मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी असते.