आठवडी बाजार सुसाट; ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:50+5:302021-06-19T04:23:50+5:30
बॉक्स अखेर किटाडी येथील आठवडी बाजार बंद ९ जून बुधवार रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आठवडी बाजार भरविण्यात आला ...
बॉक्स
अखेर किटाडी येथील आठवडी बाजार बंद
९ जून बुधवार रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आठवडी बाजार भरविण्यात आला होता. मात्र या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच स्थानिक प्रशासनासह तालुका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर मंगळवारला स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेत ध्वनिक्षेपकावरून किटाडी येथील बाजार बंदचे आवाहन केले. व्यापारी, ग्राहक व जबाबदार नागरिकांनी सूचनेचे तंतोतंत पालन करीत आठवडी बाजार बंदला प्रतिसाद दिला. त्यामुळे जनसामान्यांतून या निर्णयाचे कौतुक होत आहे.
बॉक्स
मास्क आहे, पण तोंडावर
जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग कमी झाल्याने नियमांमध्ये थोडीशी शिथिलता दिली असली तरीही मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग अद्यापही बंधनकारक केले आहे. मात्र तरीही भंडारा शहरासह काही तालुक्यांत विविध दुकानांमध्ये भाजीबाजारात, मटण खरेदीसाठी मात्र काही नागरिक विनामास्कच दिसून येत आहेत, तर काही ठिकाणी मास्क असला तर तोही तोंडावरच असतो. नाकावर मास्क न घालता अनेकजण फॅशन केल्याप्रमाणेच मास्क घालतात. तरी ग्रामीण भागात जनजागृतीसाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे.