शेत पहायला गेले, रानडुकराने शेतकऱ्याला गंभीर जखमी केले

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: September 19, 2023 05:59 PM2023-09-19T17:59:46+5:302023-09-19T18:01:27+5:30

खापा शेतशिवारातील घटना

Went to see the farm, the wild boar seriously injured the farmer | शेत पहायला गेले, रानडुकराने शेतकऱ्याला गंभीर जखमी केले

शेत पहायला गेले, रानडुकराने शेतकऱ्याला गंभीर जखमी केले

googlenewsNext

भंडारा : शेतकरी आपल्या धान शेतीवर पिक पाहण्याकरिता केला असता झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या रानडुकराने हल्ला केला. यात शेतकरी राधेश्याम ईसन गभने (४५, खरबी) हे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास तुमसर तालुक्यातील खापा शेत शिवारात घडली.

गभने हे नेहमी आपल्या शेतावर धान व इतर पिकाची पाहणी करिता जात असत. नेहमीप्रमाणे ते मंगळवारीही गेले असता झुडूपामध्ये दबा धरून बसलेल्या एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना गावकऱ्याच्या सहाय्याने तात्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. त्यांच्या पाठीला जबर जखम असून ते गंभीर जखमी आहेत. तरी शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी खरबीच्या सरपंच रत्नमाला बडवाईक यांनी केली आहे.

Web Title: Went to see the farm, the wild boar seriously injured the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.