कोरोनातही बँकांमधील वाढत्या गर्दीचे करायचे तरी काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:13+5:302021-05-31T04:26:13+5:30
सध्या जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे मेडिकल, दवाखाने वगळता बाकी अन्य दुकाने बंद आहेत. लोकांना दवाखान्यासाठी पैशांची गरज भासत ...
सध्या जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे मेडिकल, दवाखाने वगळता बाकी अन्य दुकाने बंद आहेत. लोकांना दवाखान्यासाठी पैशांची गरज भासत आहे. त्यामुळे बँका सुरू आहेत. बँकांमधील पैसे काढण्यासाठी लोक सकाळी दहा वाजल्यापासूनच बँकेसमोर रांगा करीत आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण भागात शेतकरी पीक कर्जासाठी, तसेच गतवर्षीचे पीक कर्ज भरण्यासाठी तसेच नुकसानभरपाईचे मिळालेले पैसे, श्रावण बाळ, वृद्ध, निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर रांगा दिसून येत आहेत. त्यामुळे अनेक बँकांनी सुरक्षा रक्षकासह पाण्याचीही व्यवस्था केली आहे. मात्र, बहुतांश बँकेसमोर हे चित्र दिसत नाही. बँक कर्मचाऱ्यांकडूनही अनेकदा उद्धटपणाची वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी कोंढा कोसरा येथील सहकारी बँकेत आलेल्या ग्राहकांनी केल्या. बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
बॉक्स
बँक कर्मचारी कोरोना लसीपासून वंचितच
एकीकडे बँका अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे बँकांमध्ये अतोनात होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक बँक कर्मचाऱ्यांना आजही कोरोनाची लस मिळालेली नाही. त्यामुळे अनेक बँक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असून, जिल्हा प्रशासनाने बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याची मागणी होत आहे. तसेच शासनाने बँक कर्मचाऱ्यांनाही विमा लागू करावा, अशी मागणी आहे.