रब्बी धान खरेदीची मर्यादा किती? शेतकऱ्यांत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:38 AM2021-05-25T04:38:54+5:302021-05-25T04:38:54+5:30
उन्हाळी धानाचा सातबारा नोंदणी ऑनलाइन सुरुवात झाली आहे. उन्हाळी रब्बी धानाला अजूनपर्यंत शेतकऱ्यांकडून प्रत्यक्षात किती धान खरेदी करण्याची मर्यादा ...
उन्हाळी धानाचा सातबारा नोंदणी ऑनलाइन सुरुवात झाली आहे. उन्हाळी रब्बी धानाला अजूनपर्यंत शेतकऱ्यांकडून प्रत्यक्षात किती धान खरेदी करण्याची मर्यादा ठरविण्यात आली नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ठरविलेल्या मर्यादेनुसार धान खरेदी होईल काय, असा संभ्रम शेतकऱ्यांत आहे. खरीप हंगामात ती १४ क्विंटल इतकी मर्यादा होती. उन्हाळी धानाची अजूनपर्यंत मर्यादा ठरवून देण्यात आली नाही. खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामातील धानाचा उतारा जास्त येतो. उन्हाळ्यात धानाला भरपूर सूर्यप्रकाश मिळत असल्याने कीड लागण्याची शक्यता कमी असते. तथा इतर किडीचा प्रादुर्भाव होत नाही. सिंचनाची सुविधा असल्याने तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड करण्यात येते. शेतकऱ्यांना उन्हाळी धानाचा उतारा जास्त येतो. त्यामुळे प्रति एकर १९ ते २१ क्विंटल धानाची मर्यादा ठरवून देण्यात यावी. संबंधित विभागाने तसे आदेश काढावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार प्रफुल पटेल, आमदार नाना पटोले यांच्याकडे केली आहे.