अवकाळीने गव्हाचे पीक काळवंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:56+5:30

शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून अनेकांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. गत काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सण २०१९-२० या खरीप हंगामात देखील सततच्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

The wheat crop grew in time | अवकाळीने गव्हाचे पीक काळवंडले

अवकाळीने गव्हाचे पीक काळवंडले

Next
ठळक मुद्देउत्पादनात मोठी घट : किडीने पोखरले दाणे, शेतकरी पुन्हा संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : अवकाळी पावसाने रबी हंगामातील गहू पिकाचे नुकसान झाले असून गव्हाचे पीक काळवंडले आहे. गव्हाच्या दान्यांना असणारी चमक कमी झाली असून याचा दरावर विपरीत परिणाम होणार आहे. रबी हंगामातील हरभरा पिकावरील कीडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून अनेकांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. गत काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सण २०१९-२० या खरीप हंगामात देखील सततच्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे मोठ्या हिंमतीने शेतकऱ्यांनी रबी हंगामात उसणवार करून पिकांची पेरणी केली. मात्र काढणीला आलेल्या विविध ठिकाणची अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
रबी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी, पोपट, करडई, जवस विविध पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य महादेव पचघरे, उपसरपंच महादेव घुसे, माजी सभापती झगडू बुद्धे यांनी केली आहे.
भाजीपाला पिकावर कीडीचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. करडी परिसरात अनेक शेतकºयांनी वांगे, टमाटर, फुलकोबी, मेथी भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने कीडींचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याविषयी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. परिसरात विविध शेतकºयांना कृषी विभागाच्या विविध योजनांमधून मदत करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांना शासनाने विविध योजना जाहीर केल्या असल्या तरी प्रत्येक्षात मात्र या योजनेचा लाभ मिळत नसल्याची ओरड शेतकºयांमधून होत आहे. कृषी विभागातील विविध योजनांना आॅनलाईन करणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यातच सध्या कोरोना संकटामुळे मार्चअखेरपर्यंत विविध कागदपत्रांची पुर्तता करणे गरजेचे होते. मात्र सरकारी कार्यालये बंद असल्याने अनेक शेतकरी वेळेवर कागदपत्रांची पूर्तता करू शकलेले नाही. यासाठी शासनाने विविध योजनांसाठी मुदत वाढून देणे गरजेची आहे.

Web Title: The wheat crop grew in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती