अड्याळ येथील डिजिटल शाळेचे छत गळू लागते तेव्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:16 AM2017-07-18T00:16:55+5:302017-07-18T00:16:55+5:30

शाळा सुटण्याची घंटा वाजली की, विद्यार्थी शाळेतून घराकडे धूम ठोकतात. मात्र, ना घंटा वाजली ना शाळा सुटण्याची वेळ झाली.

When the digital school roof of Adil is inundated! | अड्याळ येथील डिजिटल शाळेचे छत गळू लागते तेव्हा!

अड्याळ येथील डिजिटल शाळेचे छत गळू लागते तेव्हा!

Next

बुनियादी शाळेतील प्रकार : विद्यार्थ्यांनी काढला शाळेतून पळ
विशाल रणदिवे। लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : शाळा सुटण्याची घंटा वाजली की, विद्यार्थी शाळेतून घराकडे धूम ठोकतात. मात्र, ना घंटा वाजली ना शाळा सुटण्याची वेळ झाली. तरीही विद्यार्थ्यांनी शाळेतून धूम ठोकली. हा प्रकार घडला, अड्याळ येथील जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळेत.
अड्याळ येथील उत्तर बुनियादी शाळेचे छत गळका झाला आहे. त्यामुळे आज झालेल्या पावसाने छत गळाला लागल्याने डिजीटल शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये पाणी गळू लागले. यामुळे काही विद्यार्थी ओले झालेत तर काहिंचे पुस्तके ओली झाली. यातून बचाव होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्गखोलीतच छत्र्या उघडल्या. हा प्रकार नविन असला तरी येथील विद्यार्थी व शिक्षकांसाठी तो नवलाईचा नाही. प्रशासनाला वारंवार सांगूनही शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार येथे घडला आहे.
उत्तर बुनियादी शाळा डिजीटल झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या येथे अधिक आहे. मात्र, विद्यार्थ्यांना बसायला जागाच मिळत नसेल तर तेथील मुख्याध्यापक आणि शालेय शिक्षण समिती करते तरी काय? असा संतप्त प्रश्न पालकांनी विचारला आहे.
या ईमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविला असून जून २०१७ मध्ये मंजूर करण्यात आला असल्याचे मुख्याध्यापक सांगतात. मात्र, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊन इमारतीच्या बांधकामासाठी अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. शाळेची ही इमारत दुरुस्ती होणे अतिआवश्यक आहे. शाळेच्या इमारतीच्या छत गळती प्रकार घडल्याने विद्यार्थी परत गेले. भविष्यात शाळेचे छत कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला दोषी कोण राहिल असा संतत्प प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य महेश गभणे, उपसरपंच देविदास नगरे यांनी मुख्याध्यापक तथा शिक्षकांना विद्यार्थ्यांचे वर्ग दुसरीकडे भरविण्याची विनंती केली आहे.

Web Title: When the digital school roof of Adil is inundated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.