कमकासूरवासीयांची घर वापसी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 09:57 PM2017-10-29T21:57:34+5:302017-10-29T21:58:46+5:30
राहुल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पुनर्वसन गाव रामपुर येथे मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी यांनी ५ आॅक्टोंबर रोजी पुनर्वसित गाव सोडून त्यांच्या मुळ गावी कमकासुरात परतले. तिथे भयावह जंगल झुडपे, खितपत असलेल्या चिखलातच तंबू ठोकून संसार मांडला असताना थंडीचा कडाकाही वाढला आहे. परिणामी आदिवासी यांना मरणयातना भोगत असताना बोचºया थंडीत जीवन जगने असह्य झाले आहे.
आदिवासी यांनी पुनर्वसित गाव सोडून आज २५ दिवसांचा कालावधी लोटला परंतू अजुनपर्यंत त्यांच्या समस्यावर तोडगाच निघाला नसल्याने कमकासुर वासियांची घर वापसी कधी होणार, हे प्रश्न अजुनही अनुत्तरीयच आहे.
महत्वाकांशी बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाºया कमकासुर येथील आदिवासी यांना बंदुकी धाकावर गावातून हाकलन लावण्यात आले होते. त्यांचे पुनर्वसन रामपुर येथे करण्यात आले. मात्र गेल्या पाच वर्षापासून पुनवर्सित गावात १८ नागरी सुविधा, मुलभूत सुविधांचा तिथे वनवा होता. अनेकदा मागणी, निवेदन देवूनही समस्या सुटल्या नाहीत. परिणामी आदिवासींनी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावी परतले. कमकासुर हे बुडीत गाव असल्याने त्या ठिकाणी झुडपे तयार होवून दलदल निर्माण झाले आहे.
चहुबाजूने घनदाट जंगल असून त्याठिकाणी हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. एकंदरीत तिथे मानवी वस्ती होवू शकत नाही. अशाही परिस्थितीत कमकासूर येथील आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी तंबू उभारून संसार थाटला आहे. मानवाला मिळणाºया मुलभूत सोयी अभावी तिथे मरण्यापेक्षा स्वगावी मरणे पसंद करू, आधी सोयी सुविधा पुरवा नंतरच आमची घर वापसी होणार, अशी तटस्थ भूमिका आदिवासीयांनी घेतली आहे.
आदिवासी कसे जीवन जगतात की मरतात याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे आतापर्यंत त्यांची साधी विचारपूस करण्याकरिता एकही आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकाºयांनीही ढूंकून पाहिले नाही.
केवळ आश्वासनाची खैरात वाटत आमच्याकडे वेळ नाही असे सांगितल्याने आदिवासी यात शासन प्रशासना विरोधात रोष आहे. एकीकडे तालुक्यात आरोग्य महाशिबिराचे आयोजन होत असताना दुसरीकडे कमकासुरातील आदीवासी बांधवांना भेट द्यायला मंत्री तथा अधिकाºयांना वेळ मिळणार काय. असा सवालही प्रकल्पग्रस्त विचारीत आहेत. शासन व प्रशासनाच्या संवेदनाच हरविल्याचे जाणवत आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मोठ मोठे नेते तुमसरात येत आहेत. तिथून जर थोडा सामोर आले व आम्हाला दिलासा दिला तर आमचे कुटूंब मरण यातनेच्या कचाट्यातून बाहेर पडतील. परंतू काही स्वार्थसाधू नेत्यामुळे ते होणे शक्य दिसत नाही.
-किशार उईके, सरपंच कमकासूर.