सिंचन विहीर लाभार्थ्यांना अनुदान केव्हा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 12:17 AM2017-06-20T00:17:21+5:302017-06-20T00:17:21+5:30
धडक सिंचन अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी शासनाने मंजूर केल्या, विहिर लाभार्थ्यांनी काही रक्कम स्वत: जवळून खर्च केली,....
कोष्टी येथील विहिरीचे प्रकरण : अधिकारी म्हणतात, चौकशी होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : धडक सिंचन अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी शासनाने मंजूर केल्या, विहिर लाभार्थ्यांनी काही रक्कम स्वत: जवळून खर्च केली, उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना अजूनपर्यंत मिळाली नाही. येथे ग्रामपंचायतीने विहिरीकरिता साहित्य दिले होते. तर विहिर बांधकामकरिता लाभार्थ्यांनी रक्कम खर्च केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.
तुमसर तालुक्यातील कोष्टी व बाम्हणी येथे धडक सिंचन विहिर उपक्रमांतर्गत विहिरींचे बांधकाम करण्यात आले. यात अनुरता ईस्तारु कहालकर (बाम्हणी) ६१,६७९ रुपये, संपत आत्माराम पंचबुध्दे कोष्टी ४८ हजार, सुनिल परसराम आस्वले कोष्टी ६० हजार, लक्ष्मीबाई दयाराम आस्वले कोष्टी ५७८६१ रुपये, सुरेश माधो पवनकर कोष्टी ६५ हजार, भाऊलाल शेंडे कोष्टी ४० हजार यांनी शेतात विहिरी तयार केल्या. त्यांना विहीरींचे अनुदानाची राशी देण्यात आली. ४० ते ५० फूटावर विहिरीत पाणी लागले. विहिर बांधकामाचे साहित्य संबंधित ग्रामपंचायतीने उपलब्ध करुन दिले होते.
विहिर बांधकाम मजूरीचे रुपये लाभार्थ्यांनी स्वत:जवळील दिले. सुमारे एक ते सव्वा लक्ष मजूरी येथे लाभार्थ्यांनी दिली. शासनाकडून विहीर बांधकामाकरिता ३ लक्ष मंजूर केले जाते. जशी विहिरींचे बांधकाम केले जाते तसे अनुदान राशी लाभार्थ्यांना देण्यात येते. विहिरींचे बांधकाम झाल्यानंतर लाभार्थ्यांनी उर्वरित रकमेची मागणी केली,पंरतु त्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत अनुदान प्राप्त झाले नाही.येथे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. लाभार्र्थ्यांनी तुमसर येथील खंडविकास अधिकाऱ्यांना याप्रकरणी तक्रार केली. परंतु अजूनपर्यंत काहीच झाले नाही. खरीपाचा हंगाम सुरु झाला आहे. शेतीकरिता पैसा लागतो. येथे स्वत:जवळील रक्कम शेतकऱ्यांनी खर्च केली आता काय करावे, अशी चिंता आहे.
कोष्टी, ब्राम्हणी येथील विहीरींचे प्रकरणाची चौकशी भंडारा येथील वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. तुमसर येथील खंडविकास अधिकाऱ्यांचा प्रभार मुद्रण करुन केवळ चार ते पाच दिवस झाले आहेत. त्यामुळे सविस्तर माहिती देता येणार नाही.
- एस. एन. गायधने,
प्रभारी खंडविकास अधिकारी तुमसर